Latest Marathi News
Ganesh J GIF

समीर वानखेडे भाजपमध्ये प्रवेश करत या मतदारसंघात निवडणूक लढवणार?

रेशीम बागेला भेट दिल्याने चर्चेला उधान, आर्यन खान अटकमुळे वानखेडे चर्चेत

नागपूर दि २१(प्रतिनिधी)- अंमली पदार्थ नियंत्रण कक्षाचे मुंबई विभागाचे माजी संचालक समीर वानखेडे सध्या चर्चेत आले आहेत. यामुळे त्यांची चर्चा सुरू झाली आहे. ते सध्या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. कारण समीर वानखेडे आणि त्यांची पत्नी क्रांती रेडकर यांनी नुकतीच नागपूरच्या रेशीमबागेतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट दिली होती.

समीर वानखेडे यांनी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात अटक केली होती. त्यामुळे ते खूप प्रसिद्ध झाले होते. तर, काहीच दिवसांपूर्वी समीर वानखेडे हे लवकरच राजकारणाच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा समोर आली होती. आता ते सपत्निक आरएसएसच्या स्मृती मंदिरात पोहोचल्याने नव्या चर्चांना उधाण आले आहे. तिथे त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संचालक केशव हेडगेवार आणि गोळवलकर यांच्या समाधीचे दर्शन घेतले. यामुळे समीर वानखेडे आता भाजप प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळातून येऊ लागल्या आहेत. सध्या भाजपा समीर वानखेडे यांना अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या वाशिम जिल्ह्यातून निवडणुकीच्या रिंगणात उतरू शकतात. वाशिम हा मतदार संघ भाजपचाही बालेकिल्ला आहे. पण त्यांचा पक्ष प्रवेश कधी होणार याबाबत कोणतीही स्पष्टता करण्यात आलेली नाही. शिवाय समीर वानखेडे आणि क्रांती रेडेकर यांनीही याबाबत अधिकृत भाष्य केलेले नाही.

वानखेडेंनी नवी मुंबईतील अवैधरित्या मिळवलेल्या बार परवान्याचे प्रकरणही समोर आले. यामुळे वानखेडेंची एनसीबीच्या विभागीय संचालकपदावरून उचलबांगडी करण्यात आली होती. तसेच आर्यन खान अटक प्रकरणही बरेच गाजले होते. नंतर मात्र आर्यन खानला याप्रकरणात अडकवल्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!