Latest Marathi News

महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्रच होणार?

प्रदेश भाजपाचा प्रस्ताव केंद्रीय नेतृत्वाकडे?, मोदींची प्रसिद्धी कॅच करुन घेण्याचा प्रयत्न

मुंबई दि २१(प्रतिनिधी)- लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका एकत्र घेण्याची तयारी महाराष्ट्र प्रदेश भाजपाने सुरु केल्याची माहिती समोर आली आहे. तश्या प्रकारचा प्रस्ताव केंद्रीय नेतृत्वाकडे प्रदेश भाजपने पाठवल्याचेही पुढे आल आहे. पण अद्याप यावर अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. पण असे झाल्यास राज्यात लवकरच निवडणूकीचा बार उडू शकतो.

महाराष्ट्रातील जनतेत विद्यमान सरकातबद्दल सध्या तरी नाराजीचे वातावरण आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता आणि राष्ट्रीय मुद्दे यांचा मेळ घालत महाराष्ट्रात सत्ता मिळवण्यासाठी भाजपाने तयारी केली असल्याची चर्चा आहे. राज्यातील विधानसभा निवडणुका लोकसभा निवडणुकीसोबतच घ्याव्यात, असा महाराष्ट्र भाजपचा सूर आहे. महाविकासआघाडी पक्षांची घट्ट युती आणि शिवसेना पक्षात पडलेली फूट याचा विचार करता केंद्रीय आणि राज्यस्तरीय निवडणुका घेणे भाजपसाठी फायदेशीर ठरु शकते. याबातब एक अहवाल प्रदेश भाजपाने केंद्रीय नेतृत्वाला दिला आहे. लोकसभा निवडणूक एप्रिल-मे २०२४ मध्ये होणार आहेत. तर महाराष्ट्र विधानसभा निवडणूक ऑक्टोबर २०२४ मध्ये अपेक्षित आहे. मात्र, राज्यात झालेलं सत्तांतर उदयास आलेली नवी राजकीय समीकरणं यामुळे राज्यात विधानसभेच्या मध्यावधी निवडणुका लागण्याची शक्यता आहे. देशात सध्या असलेले अनुकूल वातावरण आणि ‘वन नेशन-वन इलेक्शन’चा प्रयोग म्हणून लोकसभा निवडणुकीसोबतच महाराष्ट्र आणि इतर नऊ राज्यांच्या निवडणुका घेण्याबाबत हालचाली सुरु झाल्या आहेत. मोदींच्या लोकप्रियतेचा फायदा घेऊन राज्य विधानसभेतही जास्तीत जास्त जागा मिळवता येऊ शकतात, असा प्रदेश भाजपचा प्रयत्न असणार आहे. मात्र, भाजपकडून याबाबत अधिकृतपणे सांगण्यात आलेले नाही.

राज्यात भाजप शिंदे गटाने अनेक लोकप्रिय निर्णय घेतले आहेत. पण त्याचा प्रभाव दिसून येण्यास बराच कालावधी लागणार आहे. सध्या शिवसेना सध्या दुबळी आहे. काँग्रेसला अद्यापही सूर गवसला नाही. अशा स्थितीत मविआ जरी एकत्र लढली तरी राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांचे नेते शरद पवार हे केवळ आपल्याच उमेदवारांवर लक्ष केंद्रीत करतील. त्याचा फायदा भाजपाला होण्याची शक्यता आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!