Just another WordPress site

‘या’ कारणामुळे शिंदे गट आणि भाजपमधील युती तुटणार?

शिंदे गटाला भाजपाचा उघड विरोध, या कारणांमुळे युती धोक्यात...?

सिल्लोड दि १३(प्रतिनिधी)- विद्यामान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत भाजपासोबत सत्ता स्थापन केली आहे. पण सत्ता स्थापनेनंतरशिंदे गट भाजपातील वाद समोर आले होते. पण आता हा वाद आंदोलनापर्यंत पोहोचला असुन कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्याविरोधात भाजपाने उघड विरोध प्रदर्शन केले आहे.

GIF Advt

अब्दुल सत्तारांच्या ताब्यात असलेल्या सिल्लोड नगरपालिकेने केलेल्या करवाढी विरोधात भाजप कमालीची आक्रमक झाली आहे. करवाढीविरोधात भाजपनं सिल्लोड बंदचं आवाहन केले. सिल्लोड शहरातील दुकानं व्यावसायिकांनी बंद ठेवावी असे आवाहन भाजपाने केले होते. त्याचबरोबर बंद दरम्यान रॅली काढून भाजपाने जोरदार घोषणाबाजी सुद्धा केली आहे. त्याचवेळी सत्तार यांनी मात्र बाजारपेठ सुरू होती असा दावा केला आहे. सत्तेत असेलेले भाजपा व शिंदेगट आगामी निवडणूका एकत्र लढण्याची भाषा करत आहेत, पण सिल्लोडमध्ये मात्र कृषी मंत्री अब्दुल सत्तार आणि भाजप कार्यकर्त्यांमधील वाद उफाळून आला आहे. काही दिवसापुर्वी देखील भाजपाने नगरपालिकेवर मोर्चा काढला होता. त्यामुळे सत्तारांसमोरील अडचणीत मोठी वाढ झाली आहे.

सिल्लोड हा विधानसभा मतदारसंघ लोकसभेसाठी दानवेंच्या जालना मतदारसंघाला जोडला आहे. त्याचबरोबर अब्दुल सत्तार आणि रावसाहेब दानवे यांच्यातीसल वाद महाराष्ट्राला सर्वश्रूत आहे. त्यामुळे उद्या भाजप शिंदे गट एकत्र लढले तरी सिल्लोडमध्ये मात्र भाजपा सत्तारांना विरोध करण्याची शक्यता आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!