Latest Marathi News
Ganesh J GIF

शिंदे गट आगामी निवडणुका ‘या’ चिन्हावर लढणार?

शिवसेना पक्षावरचा दावा पराभूत झाल्यास भाजपाचा शिंदेसाठी हा प्लान

मुंबई दि १४ (प्रतिनिधी)- एकनाथ शिंदे यांनी भाजपशी हातमिळवणी करून सत्ता स्थापन केल्यानंतर आता आगामी निवडणुका एकत्र लढणार असल्याची घोषणा केली आहे. मात्र शिवसेना पक्ष आणि चिन्ह याचा निकाल न लागल्याने आगामी निवडणुका शिंदे गट कोणत्या चिन्हावर लढणार असा प्रश्न उपस्थित केला जात असताना भाजपाने सूचक विधान करत शिंदे गटाचे चिन्ह जाहीर केले आहे. त्यामुळे भाजपाच वरचढ असल्याचे दिसत आहे.

महापालिका निवडणुका दिवाळीनंतर कधीही जाहीर होऊ शकतात असे असले तरीही न्यायालयाने अद्याप शिवसेना पक्ष आणि चिन्ह कोणाचे यावर कोणताही निर्णय दिलेला नाही.त्यामुळे शिंदे गट कोणत्या चिन्हावर निवडणुका लढणार याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. यावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सूचक विधान केले आहे. ते म्हणाले ‘यावर अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही. भविष्यात निर्णय काय होते ते बघू शिंदे गट कमळ चिन्हावर निवडणूक लढवणार का असा प्रश्न विचारला असता चर्चा करुन निर्णय घेण्यात येईल म्हणत शिंदे गट आणि भाजपात बॅकअप प्लॅन तयार ठेवत शिंदे गटाच्या उमेदवारांनी कमळ चिन्हावर निवडणूक लढवावी असा आग्रह धरला असल्याची चर्चा आहे. यामुळे आम्हीच खरी शिवसेना आम्हीच बाळासाहेबांच्या विचाराचे वारसदार असा दावा करणाऱ्या शिंदे गटाला जबर धक्का बसू शकतो. पण भाजपाचे मात्र आपसूकच उमेदवार वाढणार आहेत.

शिंदे गटाच्या जागेवर दावा करणार नाही असे म्हणत भाजपाने अंधेरीच्या जागेवर आपला उमेदवार उभा केला आहे. शिवाय शिंदे गटाच्या मतदारसंघात भाजपच्या उमेदवारासाठी ताकत उभा केली जात आहे. आता शिंदे गटालाच भाजपाचे चिन्ह देत पूर्ण गट भाजपात विलीन करण्याचा प्रयत्न भाजपाकडुन केला जात आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!