Just another WordPress site

काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यासह ‘इतके’ आमदार भाजपात जाणार

भारत जोडो अभियान राबवणा-या काँग्रेसला भाजपचा पक्ष तोडत दणका

पणजी दि १४ (प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील आॅपरेशन लोटस यशस्वी ठरल्यानंतर भाजपाने आपले लक्ष गोव्यावर केंद्रित केले आहे.त्यात त्यांना यश आले असून माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत आणि विरोधी पक्षनेते मायकल लोबो यांच्यासह काँग्रेसचे आठ आमदार भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. माजी मुख्यमंत्र्यासह विरोधी पक्षनेताच भाजपात जात असल्याने भारत जोडो अभियान राबवणा-या काँग्रेसला पक्ष तुटताना पहावा लागत आहे.

विरोधी पक्षनेते मायकल लोबो यांनी काँग्रेस विधिमंडळ पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे भाजपमध्ये विलीनीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.दिगंबर कामत, मायकल लोबो, डी लोबो, राजेश फळदेसाई, केदार नायक, संकल्प आमोणकर, अलेक्सो सिक्वेरा आणि रुडॉल्फ फर्नांडिस काँग्रेस सोडू शकतात. बुधवारी या आमदारांनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचीही भेट घेतली. लवकरच आमदारांकडून भाजपमध्ये प्रवेश करण्याची घोषणा केली जाऊ शकते, असे मानले जात आहे. त्यामुळे ११ आमदार असलेल्या गोव्यात काँग्रेसचे फक्त तीन आमदार राहण्याची शक्यता आहे. हा आधीच संकटात असलेल्या काँग्रेससाठी हा फार मोठा धक्का असणार आहे.

GIF Advt

गोव्यात भाजपचे २० आमदार आहेत. तर काँग्रेसकडे ११ जागा आहेत. याशिवाय महाराष्ट्रवादी गोमंतककडे दोन आणि गोवा फॉरवर्ड पक्षाकडे एक जागा आहे.अशा स्थितीत काँग्रेसचे आठ आमदार भाजपमध्ये गेल्यास विधानसभेत काँग्रेसला केवळ तीन जागा उरतील. त्याचवेळी भाजपची संख्या २८ वर जाणार आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!