Latest Marathi News
Ganesh J GIF

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह हे आमदार या तारखेला अपात्र ठरणार?

अपात्र आमदारांच्या कारवाई कधी होणार याची तारीख ठरली, राज्याच्या राजकारणात उलडफेर होणार?

मुंबई दि ११(प्रतिनिधी)- महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारा क्षण जवळ आला आहे. शिवसेनेच्या १६ अपात्र आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणावर आता कधी कारवाई होणार याची तारीख निश्चित करण्यात आली आहे. विधानसभा अध्यक्षांनी याबाबत माहिती दिली असल्याने एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदार अपात्र होणार की ठाकरेंचा पराभव होणार हे पहावे लागणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाने अपात्र आमदारांच्या प्रकरणावर सुनावणी घेऊन निर्णय घेण्याचे अधिकार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे दिले होते. त्यानंतर नार्वेकर यांनी सर्व आमदारांना नोटीस पाठवत आपली भुमिका मांडण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर आमदारांनी आपली भूमिका मांडली आता. शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणावर आता १४ सप्टेंबरपासून विधानसभेत प्रत्यक्ष सुनावणी होणार आहे. विधीमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात १४ सप्टेंबरला ही सुनावणी होणार आहे. विशेष म्हणजे एकाच दिवशी सर्व आमदारांची सुनावणी होणार आहे. तब्बल ३४ याचिकांवर विधानसभा अध्यक्ष यादिवशी सुनावणी घेणार आहेत. त्यामुळे निकालाकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे. या सुनावणीत ठाकरे गटाच्या विरोधात निकाल लागला तर ठाकरे गट कोर्टाचे दरवाजे पुन्हा ठोठावू शकते. त्यामुळे संबंधित प्रकरणात काय-काय घडामोडी घडतात ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान विधानभवनात १४ सप्टेंबरला दिवसभर सुनावणी चालणार आहे. प्रत्येक याचिकेला वेळ ठरवून दिला जाणार आहे. या सुनावणीच्या निकालामुळे राज्याच्या राजकारणात मोठे फेरबदल होणार आहेत.

अपात्रतेची टांगती तलवार असणारे आमदार
१. एकनाथ शिंदे
२ .अब्दुल सत्तार
३. संदीपान भुमरे
४. संजय शिरसाट
५. तानाजी सावंत
६. यामिनी जाधव
७. चिमणराव पाटील
८.भरत गोगावले
९.लता सोनवणे
१०. प्रकाश सुर्वे
११. बालाजी किणीकर
१२. अनिल बाबर
१३. महेश शिंदे
१४. संजय रायमूलकर
१५. रमेश बोरणारे
१६. बालाजी कल्याणकर

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!