Latest Marathi News
Ganesh J GIF

लग्नाचे अमिष दाखवत महिलेवर चार वर्ष बलात्कार

आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या, फेसबुकची ओळख महागात

पिंपरी चिंचवड दि १३ (प्रतिनिधी)- फेसबुकवर ओळख झालेल्या महिलेला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याची धक्कादायक घटना पुण्यातून समोर आली आहे. आरोपीने पिडीत महिलेवर गेल्या चार वर्षापासून अत्याचार केले आहेत. महिलेने तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

पोलिसांनी मनोज रमेश शिरभाते यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना २०१९ ते १० नोव्हेबर २०२२ या कालावधीत पिंपरी चिंचवडमध्ये घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेची त्यांच्या पतीसोबत घटस्फोटाची प्रक्रिया सुरु आहे. याच दरम्यान त्यांची आणि आरोपी मनोज याची फेसबुकवर ओळख झाली. कोरोनामुळे राज्यात करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या कालावधीत त्यांच्यामध्ये जवळीक वाढली. त्यांनतर आरोपीने महिलेला लग्नाचे आमिष दाखवत आणि जीवे मारण्याची धमकी देत वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले.पण लग्नाचा विषय काढताच टाळटाळ करायचा अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने तक्रार दाखल केली आहे.

पिंपरी पोलिसांनी तक्रार दाखल केल्यानंतर आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. आजकाल सोशल मिडीयाच्या माध्यमातून अनेक फसवणूकीचे प्रकार समोर आले आहेत फिर्यादी महिलाही याच फसवणूकीला बळी पडली आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!