नांदेड दि २०(प्रतिनिधी)- माहेरी गेलेल्या पत्नी आणि मुलांना बोलवा अशी मागणी करत एका तरुणाने पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केल्याची घटना नांदेडमध्ये घडली आहे. याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार नांदेड शहरातील देविदास बलदेवसिंग सिबियाया तरुणाने बायको नांदायला येत नसल्याने चक्क पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले. देविदासचे लग्न रेखाशी झाले आहे. त्याला तीन मुलेही आहेत. मागच्या काही दिवसापांसून पत्नी त्याच्यासोबत राहत नाही. मुलेही आईसोबत गेली आहेत. त्यामुळे देविदास नैराश्यात होता. त्याने आपली बायको आणि मुलांना परत बोलावण्यासाठी नांदेडमधील शोभानगरमधील पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले. बायको व मुलांना बोलवा अन्यथा, टाकीवरून खाली उडी मारू असा इशारा तो देत होता. यावेळी नातलंगानी बोलवूनही तो परत येत नव्हता अखेर पोलिसांनी त्याला मोठ्या शिताफीने देविदासला जलकुंभावरून खाली उतरवले. याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
देविदास त्याची पत्नी आणि मुलांसह हैद्राबादमध्ये कामास होता. काही दिवसांपूर्वी तो नांदेडला परतला. मात्र, पत्नी मुलांसह हैद्राबाद मध्येच आहे.पत्नी नांदेडला येत नसल्याने देविदास हताश झाला होता. त्यामुळे त्याने हे आंदोलन केले.