लग्नासाठी तरूणांना हवीय ‘अशी’ मुलगी, तर तरुणींना हवा असा जोडीदार
नव्या सर्वेक्षणात नवनवीन खुलासे, काय आहेत तरुणाईच्या जोडीदाराकडून अपेक्षा
पुणे दि २५(प्रतिनिधी)- सध्या लग्न सराईची धामधुम सुरु आहे. आपली पत्नी कशी असावी याची प्रत्येक मुलाचा मनात एक प्रतिमा तयार असते ती कशी असावी कशी दिसावी तर मुलींच्या मनातही आपला होणारा जोडीदार कसा असावा याविषयी आपापली मते असतात.कारण तरुण-तरुणींच्या जीवनातील सर्वात महत्त्वाच्या निर्णयापैकी एक म्हणून विवाहाकडे पाहिले जाते. पण नुकत्याच करण्यात आलेला एका पाहणीत नवीन निकष समोर आले आहेत.
भारतातील एक विवाह जुळवणारी संस्था Shaadi.com ने तरुण-तरुणींमध्ये आपल्या भावी जोडीदारामध्ये कोणते गुण असावेत? यावर सर्वेक्षण केले होते. यात नवीन माहिती समोर आली आहे. हे सर्वेक्षण १ डिसेंबर २०२१ आणि ३१ डिसेंबर २०२२ दरम्यान राबवण्यात आले. विशेष म्हणजे सुमारे २५ लाखजण या सर्वेक्षणात सहभाग झाले होते. यामध्ये १६ लाख पुरुष तर ९ लाख महिलांचा समावेश होता. सर्वेक्षणात सरकारी नोकरी अजूनही पहिल्या क्रमांकावर कायम आहे. आपला जोडीदार सरकारी नोकरी करणारा असावा अशी अपेक्षा तरूणींमध्ये आहे. त्याचबरोबर आयटी क्षेत्रात काम करणांना पुरुषांनाही प्राधान्य आहे. महिलांमध्ये हवाई सेवा क्षेत्र आणि आर्किटेक्ट तरुणींना सर्वाधिक मागणी आहे. पण शेतीकडे आजही तरुणी शेतकरी नवरा नको याच नजरेने पाहत असल्याचे दिसून आले आहे. पण या सर्वेक्षणात नोकरी करणार्या तरुणींना लग्नासाठी सर्वाधिक प्राधान्य मिळताना दिसते आहे. नोकरी करणार्या जोडीदाराला पुरुषांनी प्रथम प्राधान्य दिले आहे. मागील काही वर्षांमध्ये जोडीदारविषयक असणार्या अपेक्षांमध्ये वाढ झालेली आहे. त्याशिवाय अनेकांनी आपला जोडीदार निवडताना आॅनलाईन संकेतस्थळाला सर्वाधिक प्राधान्य देत असल्याचे दिसून आले आहे.
वयाबाबतही या सर्वेक्षणात माहिती देण्यात आली आहे. मागील दहा वर्षात विवाहाचे सरासरी वय दोन वर्षांनी वाढले आहे. पुरुषांचे वय अडीच वर्षांनी तर महिलांचे विवाहाचे सरासरी वय एक वर्षांनी वाढल्याचे या सर्वेक्षणात सांगण्यात आले आहे. पण ३५ वर्ष पार केलेल्या तरुण तरुणींची लग्न जमणे अवघड ठरत असल्याचा निष्कर्ष या सर्वेक्षणात नोंदवण्यात आला आहे.