या सोशल मिडीया स्टार डान्सरला पाहण्यासाठी तरुणाई बेभान
चक्क झाडावर चढत पाहिला डान्स,व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
तुळजापूर दि ५(प्रतिनिधी) – सोशल मीडिया स्टार डान्सर गौतमी पाटील हिने राज्यभरातील तरुणाईला भुरळ घातली आहे. तिच्या कोणत्याही कार्यक्रमाला तुफान गर्दी होत असते. सांगलीत तिच्या कार्यक्रमात तरूणांनी धिंगाना घातल्याचा प्रकार घडला होता. आता पुन्हा एकदा गाैतमीचा डान्स पाहण्यासाठी तरूणांनी चक्क झाडाचा आधार घेतला होता.याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
तुळजापूर तालुक्यातील वडगाव देव येथील खंडोबा यात्रेत गौतमीने आपली अदाकारी दाखवली. यावेळी नेहमीप्रमाणे गौतमी पाटीलसोबत तरुणाईनेही ठेका धरला.पण यावेळी जागा अपुरी पडल्यामुळे काही तरुणांनी चक्क झाडावर चढून हा कार्यक्रम पाहिला.गाैतमीला पाहण्यासाठी २० हजारच्या आसपास प्रेक्षक आल्याचे सांगितले जात आहे. या कार्यक्रमाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.या कार्यक्रमाला प्रेक्षकांची गर्दी वाढल्यामुळे गाैतमीला बाहेर पडणे देखील मुश्कील झाले होते. शेवटी पोलीसांच्या गाडीत गाैतमीला त्या ठिकाणाहून बाहेर काढण्यात आले.
गौतमी पाटीलचे डान्स व्हिडीओ यूट्यूब, इन्स्टाग्राम, फेसबुकवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. मात्र ती लावणीच्या नावाखाली अश्लील डान्स करत असल्याचा आरोप केला जातो. अनेक लावणी कलावंतानी तिच्या लावणी सादरीकरणावर नाराजी व्यक्त केली आहे. तर एकदा गाैतमीने देखील माफी मागितली होती.