Latest Marathi News
Ganesh J GIF

पालघरमध्ये भरदिवसा तरुणावर तलवारीने हल्ला

हल्ल्याचा थरार सीसीटीव्हीत कैद, तरुण जखमी हल्लेखोर पसार

पालघर दि २१(प्रतिनिधी)- पालघर येथे एका टोळक्याने तरुणावर भररस्त्यात तलवारीने वार केले आहेत. या हल्ल्यात संबंधित तरुण गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी वळीव पोलीस ठाण्यात तीन अज्ञात तरुणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहे. हल्ल्याचा हा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार आरोपींनी जखमी तरुणाच्या वाहनाला धडक दिली आणि अचानक तलवारीने चालकावर हल्ला केला. यावेळी एका आरोपीनं जखमी तरुणाला पकडलं तर अन्य आरोपीनं त्याच्यावर तलवारीने वार केले. या हल्ल्यात संबंधित तरुण गंभीर जखमी झाला आहे. एचएस दादू असं जखमी तरुणाचं नाव आहे. त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.हा हल्ला पालघर येथील नाईकपाडा परिसरात करण्यात आला आहे. दोन गटात झालेल्या वादातून हा हल्ला करण्यात आला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 

घटनेनंतर वळीव पोलिसांनी तीन अज्ञात तरुणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस आरोपींचा शोध घेत आहे. पण दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!