Just another WordPress site

डान्सर गौतमी पाटीलच्या कार्यक्रमावर कायमस्वरूपी बंदी येणार?

'त्या' कार्यक्रमामुळे गाैतमीच्या अडचणी वाढणार, बघा नक्की काय झाल

सांगली दि २१(प्रतिनिधी)- गौतमी पाटीलच्या अश्लिल डान्समुळे महाराष्ट्रात तिच्या कार्यक्रमांवर कायमस्वरुपी बंदी घालण्यात यावी.तसेच मिरज तालुक्यातील बेडग येथील दत्तात्रय ओमासे यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या गौतमीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य राष्ट्र विकास सेनेचे युवक प्रदेशाध्यक्ष प्रशांत लक्ष्मण सदामते यांनी सांगली जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

लावणी डान्सर गौतमी पाटील तिचा डान्स आणि तिच्या कार्यक्रमाला होणारी गर्दी यामुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. गेल्या महिन्यात मिरज तालुक्यातील बेडग येथे कार्यक्रमानिमित्त गौतमी पाटीलचा लावणीचा कार्यक्रम पाहण्यासाठी हजारो पब्लिक शाळेच्या छतावर झाडावरती, बसून पहात होते तसेच धिगाणा करत होते. यावेळी दत्तात्रय ओमासे याचा मृतदेह त्याठिकाणी आढळला, मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात या घटनेची आकस्मित मृत्यू म्हणून नोंद करण्या आली. परंतु घटनेची सखोल चौकशी करण्यात येवून दत्तात्रय ओमासे याच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या गौतमी पाटीलवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन करुन नृत्य करुन प्रत्येक कार्यक्रमात पब्लिक कडून गोंधळ निर्माण होतो. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. गौतमी पाटील हिच्या अश्लिल नृत्यामुळे सामाजात लावणी परपरा तसेच महाराष्ट्रातील एक चांगल्या लोककलेचा अनादर केला जात असलयाचे दिसत आहे, त्यामुळे तिच्या कार्यक्रमावर कायमस्वरूपी बंदी घालावी अशी देखील मागणी सदामते यांनी निवेदनात केली आहे.

GIF Advt

चार दिवसापूर्वी बीडमध्ये ट्रॅफिकची समस्या निर्माण होऊन कार्यक्रमादरम्यान दगडफेकसुद्धा झाली होती. त्यामुळे अश्लिल नृत्य सादर करणारी गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमावर महाराष्ट्रात बंदी घालण्यात यावी, अशी मागणी सदामते यांनी केली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!