‘तुला सारख्या मुलीच होतात, तुला मुलगा होत नाही’
पुणे जिल्ह्यात सारसाचा त्रास असह्य झाल्याने महिलेने घेतला टोकाचा निर्णय
पुणे दि २८(प्रतिनिधी)- सासरच्या मंडळींकडून शारीरिक आणि मानसिक त्रासाला कंटाळून दौंड तालुक्यातील खोर परिसरात असणाऱ्या मुकदम वाडी येथील एका विवाहितेने सासरच्या त्रासाला कंटाळून विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.
अश्विनी योगेश चौधरी असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव असून याबाबत संदेश जयसिंग काळकुटे यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून सासु मंदा ज्ञानदेव चौधरी, पती योगेश ज्ञानदेव चौधरी, सासरे ज्ञानदेव सोनबा चौधरी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार अश्वीनीचे लग्न काही वर्षापूर्वी योगेश चौधरी याच्याशी झाले होते. सुरुवातीचे काही दिवस चांगले गेल्यानंतर अश्वीनीला तीन मुली झाल्या. त्यामुळे सासरच्या मंडळीनी तिला त्रास देणे सुरु केले. तिला किरोकोळ कारणावरुन सासू, सासरे, नवरा हे मारहाण करत. तुला सारख्या मुलीचं होतात. असे टोमणे मारत असत. याबाबत महिलेने आश्विनीने आपल्या भावाला देखील माहिती दिली होती. पण समजूत काढून तिला परत सासरी पाठवण्यात आले पण सासरचा त्रास सुरूच राहिल्याने अश्विनी हिने जवळ असलेल्या विहिरीत उडी मारून आपली जीवन यात्रा संपवली.
या घटनेबाबत योगेश चौधरी यांनी मला फोन करून या घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलीसांनी घटनास्थळी दाखल होत अश्विनचा मृतदेह स्थानिकांच्या मदतीने बाहेर काढत तो मृतदेह रुग्णालयात पाठविण्यात आला. आता याबाबत अधिक तपास यवत पोलिस करत आहेत.