
निवडणुकीनंतर खिशाला कात्री लागणार? पेट्रोल-डिझेलच्या किमतींबाबत सरकारचा मोठा खुलासा; अफवांना पूर्णविराम
देशभरात पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ आणि आसाम या राज्यांमध्ये निवडणूका संपल्यानंतर आता पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 25 ते 28 रुपयांची वाढ होणार अशी जोरदार चर्चा सुरू आहे.यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. मात्र यावर आज दुपारी केंद्र सरकारने या सर्व चर्चांना फेटाळून लावत लावत या केवळ अफवा असल्याच सांगितलं आहे.

सध्या पश्चिम आशियात वाढलेला तणाव आणि युद्धजन्य परिस्थिती यामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीवर परिणाम होताना दिसत आहे. विशेषतः होर्मुझ सामुद्रधुनी च्या मार्गात झालेल्या तणावामुळे तेल पुरवठ्यावर दबाव वाढला आहे. जगातील सुमारे 20% तेल पुरवठा या मार्गातून होत असल्याने भाववाढ होत असल्याचे दिसून येत आहे.

तज्ञांच्या मते, जर जर कच्च्या तेलाचे दर 120 डॉलर प्रति बॅरलपर्यंत गेले, तर भविष्यात पेट्रोल-डिझेल महाग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र सध्या तरी याबाबत कोणताही अधिकृत निर्णय झालेला नाही. अमेरिका, इराण आणि इस्रायल यांच्यातील तणाव वाढल्याच्या बातम्यांमुळे परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. काही अहवालांमध्ये होर्मुझ परिसरात जहाजांवर हल्ल्यांचेही दावे करण्यात आले आहेत, त्यामुळे जागतिक तेल पुरवठ्याबाबत चिंता वाढली आहे. यामुळे भारतात पेट्रोल-डिझेल भाववाढ होईल असे म्हटले जात आहे.


