शिवसेना पक्ष चिन्ह कोणाला मिळणार? लोक म्हणतात….
सर्वेतून धक्कादायक निकाल समोर, पहा लोकांचा कल कोणाच्या बाजूने
मुंबई दि २(प्रतिनिधी) – एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेना कोणाची असा संघर्ष निर्माण झाला आहे. शिंदे गटाकडून आपणच शिवसेना असा दावा करताना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत.तर ठाकरेंनी आपलीच शिवसेना खरी असल्याचा दावा केला आहे. यावर निवडणूक आयोग निर्णय सुनावणार आहे. पण त्या आधी एक धक्कादायक सर्वे समोर आला आहे.
शिवसेना कोणाची याचा वाद निवडणूक आयोग सोडवणार आहे. पण जनतेच्या मनात काय आहे, त्यांना खरी शिवसेना कोणाची वाटते हे जाणून घेण्यासाठी एबीपी न्यूज आणि सी-व्होटरने एक सर्वे केला यात लोकांना शिवसेना पक्ष आणि चिन्ह कोणाला मिळायला हवे असा प्रश्न विचारण्यात आला तेंव्हा धक्कादायक निकाल समोर आला आहे. यावेळी ५१ टक्के लोकांनी शिवसेनेचे नाव आणि चिन्ह शिंदे गटाला मिळायला हवे, असे म्हटले आहे. तर ४९ टक्के लोकांनी उद्धव ठाकरेंना नाव आणि चिन्ह मिळावे असे उत्तर दिले आहे. या सर्वेक्षणात एकूण ४४२७ लोकांनी सहभाग घेतला होता. अशी माहिती एबीपी न्यूजने दिली आहे. त्यामुळे सध्या तरी दोन्ही गट समसमान पातळीवर असल्याचे समोर आले आहे.
न्यायालयात शिंदे गट आणि ठाकरे गटाची लढाई सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर सुरू आहे. शिवसेना कोणाची हा वाद निवडणूक आयोग सोडवणार असला तरीही १६ आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयातच सोडवला जाणार आहे. त्यामुळे जनतेचा कल कितपत खरा ठरणार याचे चित्र स्पष्ट होणार आहे.