Latest Marathi News
Ganesh J GIF

हडपसरमध्ये खासगी ट्रॅव्हल्स आणि पीएमटीची धडक

पीएमटी चालक गंभीर जखमी, अपघातात दोन्ही गाड्यांचा चक्काचूर

पुणे दि ३(प्रतिनिधी)- वानवडी पोलीस स्टेशन हद्दीमधील हडपसर स्वारगेट बीआरटी मार्गात पीएमपीएल बसला खासगी ट्रॅव्हल्सने समोरासमोर जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात घडला. यामध्ये पीएमपीएल बस चालक सुनील रामचंद्र कोलते यांच्या पोटात स्टेअरिंगचा रॉड घुसल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. तर कंडक्टर संदीप उत्तम जराड हे सुद्धा जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे.

हडपसर रामटेकडी बीआरटी मार्गावर पहाटेच्या सुमारास खासगी बस प्रवासी घेऊन बीआरटी मार्गावरून पुण्याच्या दिशेने जात होती. त्याचवेळी समोरुन पीएमटी बस आली. दोन्ही बस कन्ट्रोल झाल्या नसल्याने त्यांची समोरासमोर टक्कर झाली. हा अपघात इतका भीषण होता की दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला आहे.खासगी बस चालक युसुफ शेख हा गंभीर जखमी असून दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बस आणि ट्रॅव्हल्स जोरदार अपघात झाल्याने दोन्ही वाहनांमधील प्रवाशांना किरकोळ मार लागलेला आहे.पीएमपीएल ही रातराणी बस होती. यामध्ये ५ ते ६ प्रवासी प्रवास करत होते.

रामटेकडी बीआरटी मार्गावर येण्या-जाण्यासाठी काही ठिकाणी बॅरिकेड्स लावलेले नाही आणि त्या मार्गाची रुंदीही कमी असल्याकारणाने हा अपघात झाला असल्याची शक्यता आहे.वानवडी पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!