प्रसिद्ध अभिनेत्रीने केला या पक्षात प्रवेश, नवी इनिंग सुरू
चित्रपट कलाकारांनाही राजकारणाचे आकर्षण, पक्ष प्रवेश करताना केला हा संकल्प
मुंबई दि ३ (प्रतिनिधी)- महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. अजित पवार यांनी भाजपाशी हात मिळवणी करत उपमुख्यमंत्री पदाची शपत घेतली. पण आता एका मराठी अभिनेत्रीने एकनाथ शिंदे याच्या शिंदे गटात प्रवेश केला आहे.
मराठी सिनेसृष्टीतील काही कलाकार देखील शिंदे गटात प्रवेश केला आहे. हार्दिक जोशी, अदिती सारंगधर, अक्षया देवधर आणि माधव देवचाके या कलाकारांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आनंद आश्रम येथे सर्वांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिव चित्रपट सेनेच्या लोगोचे अनावरण देखील करण्यात आले आहे. काही वर्षे प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यानंतर आता सिनेसृष्टीतल्या कलाकारांसाठी काम करण्याची वेळ आली आहे, असं हार्दिकनं यावेळी म्हटलं आहे. तर आपल्या माणसांसाठी काम करायचं असेल, लढायचं असेल तर आपल्या लोकांची साथ हवीच. एकनाथ शिंदे साहेब असे नेते आहेत, की ते कधीही आपलं म्हणणं ऐकून घेऊ शकतात. आम्ही सगळे एकत्र नक्कीच चांगलं काम करण्याचा प्रयत्न करू, असं अदिती सारंगधर हिनं म्हटले आहे.
कलाकारांचा पक्षात प्रवेश करण्याची ही पहिली वेळ नाही. या आधी देखील अनेक कलाकारांनी विविध पक्षात प्रवेश केला आहे. प्रभाकर मोरे, गार्गी फुले यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला आहे. तर २०२० मध्ये प्रिया बेर्डेंनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. पण गेल्या वर्षी त्यांना राष्ट्रवादीला राम-राम ठोकत भाजपचा झेंडा हाती घेतला आहे.