Latest Marathi News
Ganesh J GIF

…त्या शेतकऱ्याबरोबर पोलीस कर्मचा-याने केले असे काही

पोलीस कर्मचाऱ्याच्या समयसुचकतेचा व्हिडिओ व्हायरल, तुम्हीही काैतुक कराल

आंध्रप्रदेश दि २०(प्रतिनिधी)- आंध्र प्रदेशमधील शेतकरी आंदोलनातील एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. आंध्रातील महापदयात्रा आंदोलनात सहभागी झालेल्या एका शेतकऱ्याला अचानक हृदयविकाराचा झटका आला होता यावेळी एका पोलीस कर्मचा-याच्या समयसुचकतेमुळे शेतकऱ्याचा जीव वाचला आहे

महापदयात्रा आंदोलनात सहभागी झालेल्या एका शेतकऱ्याला अचानक हृदयविकाराचा झटका आला.यावेळी आंदोलनात जमा झालेल्या शेतकऱ्यांमध्ये एकच गोंधळ उडाला. पण यावेळी एका पोलीस कर्मचाऱ्याने तत्परता दाखवून शेतकऱ्याकडे धाव घेतली. पोलीसाने शेतकऱ्याच्या छातीवर जोरात दाबायला सुरुवात केली. शेतकऱ्याचा श्वास सामान्य होईपर्यंत पोलीस कर्मचारी त्याला सीपीआर देत होता. शेतकऱ्याला तातडीने प्राथमिक उपचार मिळाल्यामुळे त्याचा जीव वाचला आहे. यानंतर शेतकऱ्याला पुढील उपचारासाठी तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. सध्या शेतकऱ्याची प्रकृती स्थिर आहे. सर्कल इन्स्पेक्टर रहमेंद्रवर्मा असे या पोलिसाचे नाव आहे. आंध्रा पोलीसांनी आपल्या ट्विटरवर तो व्हिडिओ शेअर केला आहे.

हृदयविकाराचा झटका किंवा कार्डियक अरेस्टने होणारे मृत्यू अत्यंत दुर्दैवी असतात. जिममध्ये व्यायाम करताना, नाचताना, धावताना अचानक मृत्यू झाल्याचे आपण एैकत आलो आहोत.पण या पोलीस कर्मचाऱ्याच्या समयसुचकतेचे पोलीस महासंचालक केव्ही राजेंद्रनाथ रेड्डी यांनीही कौतुक केले आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!