Latest Marathi News
Ganesh J GIF

‘आदित्य ठाकरेंनी सौंदर्य पाहून या महिला नेत्याला उमेदवारी दिली’

शिंदे गटाच्या नेत्याचे वादग्रस्त विधान, शिंदे ठाकरे वादाचा नवीन अध्याय, कोण आहेत त्या नेत्या

मुंबई दि ३०(प्रतिनिधी)- शिवसेनेत बंड केल्यापासून शिंदेसोबत गेलेले आमदार संजय शिरसाट हे ठाकरे आणि कुटुंबावर जोरदार टिका करत आहेत. आता त्यांनी आदित्य ठाकरेंविषयी वादग्रस्त विधान केले आहे. उद्धव ठाकरे यांनी काल ठाण्यात उत्तर भारतीयांची सभा घेतली. या सभेत खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी शिंदे गटावर टीका केली होती. पण आता प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

संजय शिरसाट यांनी वादग्रस्त विधान केले आहे. ते म्हणाले की, “काल उद्धव ठाकरे यांची उत्तर भारतीयांची सभा झाली. या सभेत प्रियांका चतुर्वेदी या शिवसेनेवर भाषण करत होत्या. गद्दारांचं काहीतरी केलं पाहिजे, असं वाक्य त्यांच्या भाषणात होतं. कोण आहेत या चतुर्वेदी, त्यांच्याबद्दल चंद्रकांत खैरे यांनी असं म्हटलं होतं.आदित्य ठाकरे यांनी प्रियांका चतुर्वेदींचे सौंदर्य पाहून त्यांना राज्यसभेची उमेदवारी दिली. आधी त्या काँग्रेसमध्ये होत्या आणि आता त्या आम्हाला निष्ठेचे धडे देत आहेत. उद्धव ठाकरे यांनी तीच ती कॅसेट पुन्हा वाचवली. दरवेळी उद्धव ठाकरे यांना पक्षातील लोक गेली तर ती गद्दार गेली, अशी म्हणायची सवय लागली आहे. तुम्ही नेमकं काय करता, हे उद्धव ठाकरे यांनी कधी सांगितलं का?. खरी गद्दारी उद्धव ठाकरे गटाने केली आहे, शिवसैनिकांना दाबायचे, गुलाम बनवायचे या भावनेतून त्यांना वागवायचं. जेव्हा जाहीर सभेचा वेळ येतो तेव्हा जमलेले कळवट शिवसैनिक म्हणायंच, ही त्यांनी नेहमीची लाईन आहे. उद्धव ठाकरे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना देखील विसरले आहेत. शिवसैनिकांची जागा त्यांच्या आयुष्यात कुठे हे त्यांनी स्पष्ट करावे. असेही शिरसाट म्हणाले आहेत. पण त्यांच्या विधानामुळे आगामी काळात वादंग होण्याची शक्यता आहे.

संजय शिरसाट यांच्या या वक्तव्यावर आदित्य ठाकरे यांनी पलटवार केला आहे. आदित्य ठाकरे म्हणाले की, ”हे जे बोलत आहेत, त्यांना त्यांची किंमत कळली आहे. अशा विचाराची लोक, हे सडके विचाराची लोक आहेत. काही लोकांना भाव न दिलेला बरा असतो. ते तिकडे जाऊन एक दीड वर्ष झाले त्यांना तिकडे देखील काही भाव मिळत नाही, असा टोला लगावला आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!