Latest Marathi News

 …. त्यावेळी तुम्ही नामर्द होता का?

बच्चू कडू यांनी त्या नेत्यांना फटकारले

मुंबई दि १८ (प्रतिनिधी)- एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत ४० आणि अपक्ष आमदारांसोबत बंड करत भाजपाच्या साथीने सरकार स्थापन केल्यापासून शिंदे गट आणि विरोधक यांच्यात रोज चकमकी घडत आहेत.त्याचे पडसाद राज्याच्या पावसाळी अधिवेशनात उमटत आहेत. पहिल्या दिवशी ५० खोके एकदम ओके”  अशा घोषणा महाविकास आघाडीतील नेत्यांकडून दिल्या गेल्या त्याला बच्चू कडू यांनी जोरदार प्रत्युत्तर दिल आहे.

“आम्ही खोके घेत असताना तुम्ही नामर्द होता का? तुम्हाला जर प्रत्येक आमदाराला किती खोकी दिली याबाबत माहिती होती तर तुम्ही अडवायचं होत. आम्हाला थांबवायचं होतं. विरोधक अशा प्रकारचे आरोप करतच असतात त्याला काहीही अर्थ नसतो”, असं बच्चू कडू म्हणाले आहेत.त्यामुळे पुन्हा एकदा वाद होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर फोन टॅपिंगप्रकरणी बच्चू कडू यांचं नाव पुढे येत आहे. याप्रकरणीही त्यांनी खुलासा केला आहे. माझा फोन टॅप करण्यात आला होता. मात्र, हे सगळ चुकीचं आहे. नेत्याचा फोन टॅप करणं हा नालायकपणा आहे. दरम्यान, या प्रकरणात मला कोणत्याही अधिकाऱ्याच्या, पक्षाच्या क्लिनचीटची गरज नाही. अशी वेळ या बच्चू कडूवर येणार नाही. काही केले असेल तर सिद्ध करावे. त्यासाठी कोणाच्या पाया पडायची गरज नाही असे आव्हानच त्यांनी दिले आहे.

अधिवेशनकाळात पहिल्या दिवशी विधानभवनाच्या पायऱ्यांवर शिंदे – फडणवीस सरकारविरोधात आंदोलन केले होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानभवनात दाखल होताच विरोधकांकडून ‘५० खोके एकदम ओक्के, आले रे आले गद्दार आले’ अशा घोषणाबाजी करण्यात आली होती. त्यावरून बच्चू कडू यांनी विरोधकांवर पलटवार केला आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!