Latest Marathi News
Ganesh J GIF

भाजपची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर!; नितीन नवीन यांच्या टीममध्ये विनोद तावडे, स्मृती इराणींना महत्त्वाची जबाबदारी

भारतीय जनता पक्षाचे (BJP) राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी सोमवारी पक्षाच्या नव्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची अधिकृत घोषणा केली आहे. आगामी राजकीय आव्हाने आणि संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने जाहीर करण्यात आलेल्या या नव्या कार्यकारिणीत अनुभवी नेत्यांवर पुन्हा एकदा विश्वास दाखवण्यात आला असून, महिला नेत्यांनाही मोठी संधी देण्यात आली आहे. या नव्या रचनेत राष्ट्रीय महामंत्री (General Secretary) आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष (Vice President) यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या पदांवर मोठ्या नेत्यांची वर्णी लागली आहे.

राष्ट्रीय महामंत्रीपदी विनोद तावडे आणि स्मृती इराणी

पक्षाच्या संघटन बांधणीत केंद्रीय भूमिका बजावणाऱ्या राष्ट्रीय महामंत्रीपदी महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते विनोद तावडे आणि माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विनोद तावडे यांच्या संघटनात्मक अनुभवाचा आणि स्मृती इराणी यांच्या आक्रमक नेतृत्वाचा फायदा पक्षाला राष्ट्रीय स्तरावर होणार आहे.

राष्ट्रीय उपाध्यक्षपदी १३ नेत्यांची नियुक्ती

पक्षाने जाहीर केलेल्या नव्या यादीत १३ ज्येष्ठ नेत्यांना राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. यात अनेक माजी मुख्यमंत्री आणि अनुभवी नेत्यांचा समावेश आहे. राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे सिंधिया, उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत आणि राम माधव. बैजयंत जय पांडा, डी. पुरंदेश्वरी, रेखा वर्मा, वर्षाबेन नरेंद्रभाई दोशी, भारती प्रवीण पवार, मनप्रीत सिंह बादल, लाल सिंह आर्य, एम. नागराजा, तारिक मन्सूर आणि मधुचंद्र कर.

महिला नेतृत्वाला विशेष प्राधान्य

नितीन नवीन यांनी जाहीर केलेल्या या नव्या टीमचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे यात महिला नेत्यांना मिळालेले मोठे स्थान होय. राष्ट्रीय उपाध्यक्षपदापासून ते महामंत्रीपदापर्यंत महिला नेत्यांचा झालेला समावेश पक्षाची महिला सक्षमीकरणाची भूमिका अधोरेखित करतो. या नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीमुळे भाजपच्या राष्ट्रीय संघटनेत अधिक ऊर्जा आणि अनुभव पाहायला मिळणार आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!