‘माझ्या पतीने १५ कोटीसाठी सतीश कौशिक यांची विष देऊन हत्या केली’
उद्योगपतीच्या पत्नीचा खळबळजनक दावा, सतिश कौशिक मृत्यू प्रकरणात ट्विस्ट
मुंबई दि १२(प्रतिनिधी)- प्रसिद्ध अभिनेता, दिग्दर्शक सतीश कौशिक यांचा त्यांच्या दिल्लीतील फार्म हाऊसमध्ये मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूसंदर्भात आता नवनवे खुलासे होत आहेत. आता कौशिक यांच्या मृत्यूमागे दिल्लीतील उद्योगपती विकास मालू यांच्या पत्नी सानवी मालू यांनी केलेल्या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे.
सानवी यांनी आपले पती विकास मालू यांच्यावर काैशिक यांच्या हत्येचा आरोप केला आहे. सतिश कौशिक यांच्या मृत्यूसंदर्भात आपल्या पतीवर आरोप करत सानवी यांनी म्हटले आहे की, तिच्या पतीचे कौशिक यांच्याकडे १५ कोटी रूपयांचे कर्ज होते. या कर्जाच्या पैशाची सतिश कौशिक यांच्याकडून वारंवार मागणी होत होती.मृत्युपूर्वी सतिश कौशिक यांनी ज्या फार्महाऊसवर पार्टी केली होती, त्या फार्महाऊसचा मालक हे उद्योगपती विकास मालू होते. विकास यांनीच सतीश यांना चुकीची औषधं खायला दिली असावीत जेणेकरून त्यांना पैसे द्यायची गरज पडू नये, असा आरोप सान्वीने केला आहे. विकास मालूवर एक वर्षाआधी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता, ज्याचा पोलीस अजूनही तपास करत आहेत. यादरम्यान विकास मालू यांनी आपल्यावरील आरोप खोडून काढण्यासाठी इन्स्टाग्रामला एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना त्यांनी आपली बदनामी केली जात असल्याचा आरोप केला आहे. दरम्यान प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांच्या निधनानं बॉलिवूडला मोठा धक्का बसला आहे. सतीश कौशिक यांच्या मृत्यू प्रकरणी नवे नवे खुलासे होऊ लागले आहेत.
सतिश काैशिक यांच्या मॅनेजरनेही आता नवीन खुलासा केला आहे. राय यांनी काैशिक यांना रूग्णालयात दाखल केले होते. त्यावेळी “मैं मरना नही चाहता, मुझे बचा लो, मला माझ्या बायको आणि मुलासाठी जगायचे आहे. असे काैशिक म्हणाले होते. संतोष राय गेल्या ३४ वर्षांपासून सतीश कौशिक यांच्यासोबत होते. दरम्यान पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.