Latest Marathi News
Ganesh J GIF

पुण्यात सीएकडून तीन वर्षे महिलेवर जबरदस्तीने अत्याचार

अत्याचाराचा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी,पुण्यात महिला असुरक्षित

पुणे दि २८(प्रतिनिधी)- पुण्यातल्या एका सीएने आपल्या आॅफीसमधील सहकारी ५० वर्षीय महिलेवर बलात्कार करून, त्याचा विडिओ तयार केला. या व्हिडीओच्या आधारे ब्लॅकमेल करून हा सीए तीन वर्षे तिच्यावर बलात्कार करत होता. हा प्रकार उघड झाल्यानंतर आरोपी सीएला येरवडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हा सीए एका पक्षाच्या मोठ्या नेत्याकडे काम करत होता अशी माहिती आहे.

या सीएने पीडित महिलेवर सन २०१९ ते २०२२ या कालावधीत अत्याचार केले. याप्रकरणी या पीडित महिलेने फिर्याद दिली आहे. या प्रकरणाबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अत्याचाराचा आरोप असलेल्या सीएचे नाव अनिरुद्ध सतीश शेठ आहे. कोथरूड परिसरात त्याचे ऑफिस आहे. फिर्यादी महिला त्याच्या ऑफिसमध्ये नोकरी करत होती. त्यामुळे दोघांची चांगली ओळख होती. मार्च २०१९ मध्ये अनिरुद्ध शेठ यांनी फिर्यादी महिलेला भुगावला फ्लॅट दाखवण्याच्या बहाण्याने नेले. भुगाव येथील फ्लॅटवर गेल्यानंतर आरोपीने केक पेस्ट्रीमध्ये गुंगीचे औषध देऊन महिलेसोबत जबरदस्तीने शरीर संबंध ठेवले. या सर्व घटनेचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करून नंतर तो व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार जबरदस्तीने शरीर संबंध ठेवले. पण सतत होत असलेल्या अत्याचारामुळे महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. यामुळे महिला किती सुरक्षित असा प्रश्न उपस्थित होत आहे.

काही दिवसांपूर्वी अनिरुद्ध शेठ याने महिलेसोबत पुन्हा जबरदस्ती करत कोणाला सांगितल्यास तुझ्या मुलीला मारून टाकेन अशी धमकी दिली. या सर्व प्रकारानंतर पीडित महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलीसांनी आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.पण आॅफीसमधील लैगिंग शोषणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!