ठाणे दि ९(प्रतिनिधी)- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पुतण्या महेश शिंदे याच्यासह १० जुगाऱ्यांना क्राइम ब्रांचने जुगार खेळताना अटक केली आहे. महेश शिंदेवर क्राइम ब्रांचने अटकेची कारवाई केली. हे सर्वजण शहरातील जीसीसी क्लब या हॉटेलमधील एका रूममध्ये जुगार खेळत होते. ही रूम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पुतण्या महेश शिंदे यांच्या नावावर बुक करण्यात आली होती.
मीरारोडमधील जीसीसी क्लब हॉटेलमध्ये बेकायदेशीररीत्या जुगार खेळला जात असल्याची माहिती मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलिसांच्या गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक अविराज कुरहाडे यांनी या हॉटेलवर छापा टाकला. हॉटेलमधील ७९४ क्रमांकाच्या रूममध्ये महेश शिंदे यांच्यासह दहा जण जुगार खेळत होते. पोलिसांनी या सर्वांना ताब्यात घेतले आहे. मात्र, चौकशी करून त्यांना सोडण्यात आले होते. परंतु या प्रकरणाची सर्वत्र चर्चा सुरू झाल्यानंतर रात्री उशिरा पोलिसांनी महेश शिंदे यांच्यासह सर्व जुगाऱ्यांना अटक केली आहे.
शिंदे सरकार स्थापन झाल्यापासून रोज अडचणींचा सामना करत आहेत लांबलेला मंत्रिमंडळ विस्तार होत असताना काल अब्दुल सत्तार यांच्या मूलींवर टीईटी घोटाळ्याचे आरोप झाले होते. तर आता मुख्यमंत्र्यांच्या पुतण्यालाचा पोलीसांनी अटक केली आहे.