Latest Marathi News
Ganesh J GIF

आमच्या मनातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच

राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर विजयी झालेल्या महिला खासदाराकडून फडणवीसांचे काैतुक

अमरावती दि ११(प्रतिनिधी)- राज्यातील सत्तांतरानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र, त्यानंतर भाजपच्या नेतेमंडळींकडून वारंवार फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदाला धरुन वक्तव्य करण्यात आली आहेत चंद्रकांत पाटील, चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्या प्रकारची वक्तव्य केली आहेत आता त्यात खासदार नवनीत राणा यांची भर पडली आहे. त्यामुळे शिंदेनी दिलेले मुख्यमंत्री पद तडजोड म्हणून दिल्याची चर्चा आहे.

विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांतील पाच जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. अमरावतीसाठी पदवीधर मतदार संघातून डॉ. रणजीत पाटील यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. त्यांच्या प्रचारार्थ सभेत नवनीत राणा यांनी फडणवीसांचे काैतुक केले. त्या म्हणाल्या की, “देवेंद्र फडणवीस यांचं जिथे जिथे पाऊल पडलं मग गुजरात असो वा गोवा तिथे भारतीय जनता पक्षाला नेत्रदीपक यश मिळालं. फडणवीस यांचं काम बोलतं. त्यांच्या कामाची स्टाईल धडाकेबाज आहे. त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा डंका महाराष्ट्रात तर वाजतोच आहे, पण इतर राज्यातही त्यांच्या कामाची चर्चा होते. सगळ्यांसाठी ते उपमुख्यमंत्री असतील पण आमच्या मनातील मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीसच आहेत”, असे म्हणत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यशैलीची तोंडभरुन स्तुती केली आहे. त्याचबरोबर नवनीत राणा यांनी रणजित पाटील विजयी होतील असा विश्वासही व्यक्त केला आहे.

 

मागील काही दिवसांपासून विरोधक देखील सरकारमध्ये मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीसच असल्याची टीका करतात. तसेच अनेक भाजपनेते देखील अशी विधाने करतात. त्यामुळे सरकारमध्ये मुख्यमंत्री नेमकं कोण असा प्रश्न नेहमीच उपस्थित होत असतो. पण शिंदे गटाने यावर कधीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!