Latest Marathi News
Ganesh J GIF

पार्किंगच्या वादातून दोन कुटुंबात जोरदार हाणामारी

भांडणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल, सरदारजीने रागात उचलले टोकाचे पाऊल

दिल्ली दि २३(प्रतिनिधी)- मोठ्या शहरात पार्किंगवरुन होणारे वाद सर्रास पहायला मिळतात. त्यात जर ते शेजारीच असतील तर वाद हे ठरलेले असतात. पण आता सोशल मिडीयावर पार्किंगवरुन दिल्लीत झालेल्या वादाचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. यात एका वृद्धाने एका कुटुंबाला बेदम मारहान केली आहे. तसेच महिलांसोबत देखील गैरवर्तन करण्यात आले आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरीही संतापले आहेत.

सोशल मिडीयावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ दिल्लीतील संतनगर भागातील आहे. पार्किंगच्या वादावरून दोन शेजारी एकमेकांशी भिडले होते. यावेळी त्यांच्यात हाणामारी देखील झाली होती. संतनगर भागातील एका काॅलनीत रस्त्यावर एका व्यक्तीने गाडी उभी केली होती. यावेळी एक वृद्ध शीख गृहस्थ हातातील काठी घेऊन समोरील कुटुंबाच्या अंगावर धावून जातात. सरदारजींच्या कुटुंबातील सदस्यही समोरच्या कुटुंबातील दोघांना मारु लागतात. महिला ही मारहाण थांबवण्यासाठी जातात. पण तरीदेखील ते त्यांना बाजूला करत त्या व्यक्तीला काठीने बेदम मारहाण करतात. यावेळी त्या सरदारजींना कोणीही थांबवण्याचा प्रयत्न करत नाहीत. हा मारहाणीचा प्रकार उपस्थित असलेल्या कोणीतरी आपल्या कॅमे-यात कैद केला होता. आता तो सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल झाला आहे. @divya_gandotra ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकरीही चांगलेच संतापले आहे. काहीजण सरदारजींवर कडक कारवाई झाली पाहिजे अशी मागणी करत आहेत. तर काही जण गाडी नीट पार्क करायला पाहिजे असे सांगत आहेत. व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!