Latest Marathi News
Ganesh J GIF

पतीने पत्नीला प्रियकरासोबत फिरताना रंगेहाथ पकडले?

सोशल मिडीयावर पत्नीच्या कारनाम्याचा व्हिडिओ व्हायरल, नेटकरी संतप्त, पुरूषांना न्याय देण्याची मागणी

दिल्ली दि २३(प्रतिनिधी)- दिल्ली मेट्रो नेहमीच चर्चेत असते.पण अलीकडे ती नको त्या गोष्टीमुळेच जास्त चर्चेत असते. आता ही दिल्ली मेट्रो पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कारण एका पतीने आपल्या पत्नीला तिच्या प्रियकरासोबत फिरताना पकडल्याने स्टेशनवर मोठा ड्रामा झाला. हा सर्व ड्रामा कॅमे-यात कैद झाला आहे.

दिल्ली मेट्रो स्टेशनवरील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात पतीने तिच्य पत्नीला प्रियकरासोबत फिरताना रंगेहाथ पकडले आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत दिसत आहे की, एका तरुणाला आपल्या पत्नीचे बाहेर अफेअर असल्याचा संशय होता. त्यामुळे तो तिच्या मागावर होता. घटनेच्या दिवशी त्याची पत्नी प्रियकरासोबत फिरत होती. ती मेट्रो स्टेशनवर फिरत असताना पती आपला कॅमेरा चालू करत पत्नीला आवाज देतो आणि विचारतो झाले का फिरून? पतीला पाहताच महिला गडबडून जाते. तिच्या चेहऱ्याचा रंग उडतो. पण काही क्षणात हो झालं फिरुन, मग काय झालं? असा सवाल करते. यावर तु यासोबत का फिरत आहेस लग्न माझ्यासोबत करून प्रियकरासोबत का फिरत आहेस असे विचारतो यावेळी दोघांमध्ये वाद सुरू होता. पत्नी आपल्या पतीला मारहाण करण्याचाही प्रयत्न करते. त्यावर तुझा व्हिडीओ शूट केला आहे. आता कोर्टात ये तू, असं म्हणतो. यावेळी स्टेशनवर मोठी गर्दी जमा झाली होती. हा वाद सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल झाला आहे. अनेकांनी या प्रकारावर संताप व्यक्त केला आहे.

व्हिडिओत अपशब्दांचा वापर करण्यात आला आहे व्हिडिओ आपल्या जबाबदारीवर पहावा

नेटकऱ्यांनीही यावर कमेंट्स करत संताप व्यक्त केला आहे. तसेच ट्विटरवर जाॅईन मॅन राईट असा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. दरम्यान पती पत्नीच्या नात्यात विश्वास महत्वाचा असतो. पण तो कमकुवत झाल्यास नात्यात दुरावा निर्माण होतो. व्हायरल व्हिडीओत नेमके हेच होताना दिसत आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!