Latest Marathi News
Ganesh J GIF

नाशिक-सिन्नर महामार्गावर एसटी बसचा भीषण अपघात

घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, ४ ते ५ जणांचा मृत्यू

नाशिक दि ८(प्रतिनिधी)- नाशिक-पुणे महामार्गावरील शिंदेपळसे टोलनाक्यावर एसटी महामंडळाची बस पेटल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. आग लागल्यानंतर धावत्या बसणं दोन वाह्नानाही धडक दिल्यानं या घटनेत तीन प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. याशिवाय अनेक प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे. या घटनेनंतर अग्निशमन दलाच्या गाड्या तत्काळ घटनास्थळी दाखल झाल्या असून मदत व बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे. त्यामुळे भरदिवसा नाशिकजवळ एसटी महामंडळाची बस पेटल्यानं स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना वाचण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील राजगुरुनगर आगाराची बस नाशिकच्या दिशेने येत असताना नाशिक-पुणे महामार्गावरील शिंदेपळसे टोलनाक्यावर बसला भीषण आग लागली. वेग जास्त असल्यांन बसनं दोन ते तीन वाहनांनाही धडक दिली. त्यामुळं बसमधील प्रवाशामध्ये घोंधळ उडाला होता. त्यानंतर अनेकांना बसच्या बाहेर पडण्यासाठी बसमधून उद्या मारल्या. परंतु बसमधील आग वाढत गेल्यामुळ तीन प्रवाशांचा आगीत होरपळून मृत्यू झाला आहे. त्यामुळं आता नाशिकमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. नाशिक- पुणे महामार्गावर एसटी महामंडळाच्या बसला आग लागल्याचं समजताच नाशिकमधील अनेक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलीस, स्थानिक नागरिकासह अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु केले आहे.

बसमध्ये आग का लागली किवा यामागे कुणाचा हात आहे का, याचं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेलनाही. सध्या घटनास्थळी मदत व बचावकार्य सुरु असून या प्रकरणाची चौकशी होण्याची शक्यता आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!