Just another WordPress site

गुजरातमध्ये सलग सातव्यांदा नरेंद्र मोदींच्या भाजपाची सरकार

भाजपाच्या विजयात काँग्रेस, आपचा सुपडा साफ,बघा कोणला किती जागा

अहमदाबाद दि ८(प्रतिनिधी) – संपुर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपाने एैतिहासिक कामगिरी करत मोठे यश मिळवले आहे.१८२ जागा असणा-या गुजरात विधानसभेत भाजपाने १५७ जागा जिंकत मोठा करिश्मा केला आहे. २०१७ च्या निवडणुकीत निसटता विजय मिळवणा-या भाजपाने यंदा मात्र दिडशे जागा जिंकत नवीन विक्रम केला आहे. आप आणि काँग्रेसला मात्र दारूण पराभवाचा सामना करावा लागला आहे.

GIF Advt

गुजरात मध्ये मागील २०१७ च्‍या निवडणुकीत भाजप पक्षाला केवळ ९९ जागांवर समाधान मानवे लागले होते. काँग्रेसने ७७ जागा जिंकत आपले अस्तित्व जिवंत ठेवण्‍यात यश मिळवले होते. यंदाच्या निवडणुकीत मात्र भाजपाने पद्धतशीर पणे नियोजन करत अभूतपूर्व यश मिळवले आहे. या निवडणुकीत भाजपाला १५७ जागांवर विजय मिळाला आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत भाजपाच्या जागेत ५८ जागांची वाढ झाली आहे.तर २०१७ च्या निवडणुकीत भाजपाला घाम फोडणा-या काँग्रेसला अवघ्या १६ जागा मिळाल्या आहेत. विरोधी पक्षनेते पद मिळवण्यासाठी किमना १९ जागांची गरज आहे. पण काँग्रेसला १६ जागा मिळाल्यामुळे विरोधी पक्षनेतेपद देखील मिळणार नाही तर गुजरात आपणच जिंकणार असा दावा करणाऱ्या आपला या निवडणुकीत अवघ्या ५ जागा जिंकता आल्या आहेत. विशेष म्हणजे आपचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार गढवी यांचा नामुष्कीजनक पराभव झाला आहे. आपच्या एंट्रीने विरोधकांची ताकत विभागल्याचा मोठा फायदा भाजपाला झाला आहे. अपक्षांना ४ जागेवर विजय मिळवता आला आहे. भाजपाची आजवरची गुजरातमधील ही सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. १२ डिसेंबरला सध्याचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हेच पुन्हा मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची शक्यता आहे.गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ही घोषणा केली आहे. येत्या १२ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडेल. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह देखील उपस्थित राहणार आहेत.


गुजरात एकेकाळी काँग्रेसचा गढ होता पण मागील सात निवडणुकांमध्ये भाजपाला आपली विजयाची परंपरा कायम राखली आहे. यंदाच्या विजयाचे वैशिष्ट्य म्हणजे भाजपाचे काँग्रेसच्या १९८५ च्या निवडणुकीतील १४९ जागा जिंकण्याचा रेकाॅर्ड तोडत १५७ जागा जिंकल्या आहेत. भाजपाने याआधी २००२ च्या निवडणुकीत १२७ जागा जिंकत सर्वोत्तम कामगिरी केली होती. निवडणूकीत या मोठ्या यशामुळे आगामी काळात गुजरातमधील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रचंड विजयानंतर भाजपकडून जल्लोष साजरा करण्यात येत आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!