
पुण्यातील वसतिगृहाच्या कामावरून भाजपच्या आजी-माजी नगरसेविकांमध्ये तुफान खडाजंगी झाल्याची माहिती समोर आली आहे. दोनगटातील वादाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होतोय

वसतिगृहाच्या कामाच्या टक्केवारीवरून दोघांमध्ये आरोप-प्रत्यारोप केले जात असून पक्षातील हा वाद चव्हाट्यावर आला आहे. बाणेरमधील माजी नगरसेविका राजश्री काळे आणि विद्यमान नगरसेविका रोहिणी चिमटे यांच्यात हा वाद रंगला आहे .

महापालिकेतर्फे बाणेर येथे मागासवर्गीय आदिवासी विद्यार्थ्यांसाठी निवासी शिक्षण केंद्र उभारले जात आहे. 2017 मध्ये काळे या नगरसेविका असताना त्यांनी या केंद्रासाठी प्रयत्न केले होते. मात्र, या कामाची सुरुवात होऊन अनेक वर्ष झाले पण काम पूर्ण झालं नाही. रखडलेल्या कामासाठी तीन कोटी रुपयांची निविदा काढण्यात आलेली आहे.

याचा पाठपुरावा करण्यासाठी काळे या भवन रचना विभागात आल्या होत्या. त्यावेळी रोहिणी चिमटे आणि ठेकेदारात चर्चा सुरू असल्याचं त्यांनी बघितलं. या चर्चा एकूण दोघींमध्ये टक्केवारीवरून वाद झाल्याचा आरोप होत आहे. भाजपच्या दोन्ही नगरसेविका यांच्यात झालेल्या वादावादीची चर्चा सध्या शहरभर सुरू आहे.

