‘शिवसेना भवन, शाखा आणि निधी शिंदे गटाला द्या’
अडचणीतील उद्धव ठाकरेंना जोरदार दणका, ठाकरे गटाचे अस्तिवावरच प्रश्नचिन्ह?
मुंबई दि १०(प्रतिनिधी)- भारतीय निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री शिंदे यांना शिवसेना पक्षाचे नाव आणि पक्षाचे चिन्ह म्हणजेच ‘धनुष्य व बाण’ देण्याचे निर्देश दिल्यानंतर उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला. शिंदे गटाने आता पुन्हा एका उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का देत ठाकरेंच्या अडचणी वाढवल्या आहेत.
शिवसेना भवन, शिवसेनेच्या सर्व शाखा आणि शिवसेनेचा निधी आम्हाला देण्यात यावा, अशी मागणी करणारी याचिका शिंदे गटाने आज सोमवारी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. वकील आशिष गिरी यांनी शिंदे गटाच्या वतीने ही याचिका सर्वोच्च न्यालयात दाखल केली. त्यामुळे या मागणीनंतर उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. विशेष म्हणजे आम्ही शिवसेना भवनावर आणि निधीवर कोणताही दावा करणार नाही असे शिंदे गटाकडून सांगण्यात आले होते. पण त्याच्या नेमकी उलट भुमिका शिंदे गटाने घेतली आहे. पण यामुळे उद्धव ठाकरे यांच्यांकडून शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गेल्यानंतर आता शिवसेना भवन, शाखा आणि सर्व बॅकांमधील पक्षनिधीही हातून जातोय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान “मी कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता नसून एक वकील आणि मतदार या नात्याने ही याचिका दाखल केली आहे”, असं अॅड. आशिष गिरी यांनी सांगितलंय. दिल्लीतील प्रसारमाध्यमांशी बोलत असताना त्यांनी ही माहिती दिली. तसंच निकाल लागेपर्यंत निधी वापरण्यावर निर्बंध घालण्यात यावा,” अशी मागणी देखील त्यांनी याचिकेतून केली आहे.
निवडणूक आयोगानं धनुष्यबाण आणि शिवसेना शिंदे गटाला दिली. हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का होता. मात्र या धक्क्यातून सावरत असतानाच आता आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. शिंदे गटाकडून पक्षनिधीवर दावा करण्यात आला आहे. या प्रकरणात एक याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणात सुप्रीम कोर्ट काय निर्णय देणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.