Latest Marathi News
Ganesh J GIF

गुरुजी तुम्ही पण! शिक्षक दारु पिऊनच शाळेत दाखल

शिक्षकाचा दारू पिऊन झोपल्याचा व्हिडीओ व्हायरल, झिंगाट शिक्षकाला बोलताही येईना

बारामती दि २४(प्रतिनिधी)-बारामती तालुक्यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक चक्क दारू पिऊन झोपाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बारामती तालुक्यातील तरडोलीमधील भोईटे वस्ती येथील शाळेत ही घटना घडली आहे. हा प्रकार गावातील नागरिकांनी कॅमेऱ्यात कैद केला आहे. पालकांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे.

भरत चव्हाण असे या शिक्षकाचे नाव असून भोईटेवाडी जिल्हा परिषद शाळेत २५ विद्यार्थी शिकत आहेत.चव्हाण यांनी याआधी देखील मद्यपान करुन शाळेत येण्याचा प्रताप केला आहे. ग्रामस्थांनी आणि पालकांनी त्यांना गेल्यावर्षी सुधारण्याची संधी दिली होती. मात्र शिक्षकाने त्याच्यावर लक्ष न देता तर्राट होणे चालूच ठेवले. व्हायरल व्हिडिओत दिसत आहे की, शिक्षक खुर्चीत बसून टेबलावर डोके ठेवून झोपी गेले होते. भरपूर दारू प्यायल्याने ते शुद्धीत देखील नव्हते. यावेळी नागरिकांनी काही प्रश्न विचारल्यानंतर शिक्षकाला नीट बोलता देखील येत नव्हते. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. अनेकांनी यावर संताप व्यक्त केला आहे. शिक्षणासाठी पालक आपल्या मुलांना प्राथमिक शाळेत घालतात. शिक्षकांकडे त्यांना शिकवण्याची जबाबदारी असते. पण प्राथमिक शाळेत शिक्षकाचे असे वर्तन पाहून पालक संतापले आहेत. या शिक्षकावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

संबंधित शिक्षकाची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आलेली आहे. या शिक्षकाची वैद्यकीय तपासणी होईल जे तपासणीत येईल त्यावर कडक कारवाई होईल असे शिक्षणाधिकारी गावडे यांनी सांगितले आहे. तर मुख्याध्यापकाला देखील नोटीस बजावली असल्याचे गावडे यांनी सांगितले आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!