Just another WordPress site

शिरूर लोकसभा मतदासंघात अमोल कोल्हेंचा पत्ता कट होणार?

पार्थ पवारांच्या नावाची चर्चा असतानाच या नेत्याच्या मुलीची एंट्री

पुणे दि ८(प्रतिनिधी)- एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेने बंडखोरी केल्यानंतर राज्यातील राजकीय समीकरणे कमालीची बदलली आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा विधानसभेसाठी काय समीकरणे असणार याचा आत्ताच अंदाज बांधणे मुश्किल आहे. पण हॅट्रिक करणारे शिवसेनेचे शिरूर लोकसभेचे खासदार आढळराव यांचा पराभव करत विजय मिळवणा-या राष्ट्रवादीत उमेदवारांवरुन राजकारण रंगण्याची शक्यता आहे. खासदार अमोल कोल्हे राष्ट्रवादीत नाराज असल्याच्या बातम्या आल्यानंतर राष्ट्रवादीतील दोन बड्या नेत्यांच्या मुलाची नावे चर्चेत आली आहेत.

शिवप्रताप चित्रपटाच्या प्रदर्शनाआधी अमित शहांची घेतलेली भेट, राष्ट्रवादीच्या महत्वाच्या कार्यक्रमांना मारलेली दांडी यामुळं कोल्हे राष्ट्रवादीत नाराज असुन ते भाजपात जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात आहेत. त्याचवेळी राष्ट्रवादीकडून विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना शिरूर लोकसभा मतदारसंघातून संधी दिली जाण्याची शक्यता असतानाच आणखी एका उमेदवाराची एंट्री झाली आहे. दिलीप वळसे पाटील यांची मुलगी पूर्वा वळसे पाटील हिच्याही नावाची अचानक चर्चा सुरु झाल्याने मोठे राजकीय नाट्य या ठिकाणी पहायला मिळण्याची शक्यता आहे. भाजपाने शिरूर मतदारसंघात लक्ष घालत पक्षबांधणी करत आगामी खासदार भाजपाचाच असेल अशी घोषणा केली. ही घोषणा शिंदे गटात गेलेल्या आढळराव पाटलांना धोक्याची घंटा आहे. भाजपाकडुन या ठिकाणी भोसरीचे आमदार महेश लांडगे यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे.म्हणून ज्या राष्ट्रवादीवर आरोप करत शिवसेनेने बंडखोरी झाली त्याच राष्ट्रवादीच्या स्थानिक कार्यक्रमांना उपस्थित राहत आढळरावांना राजकीय जाणकारांना कोड्यात टाकले आहे. मध्यंतरी पार्थ पवार यांना शिरूर लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी दिली तर राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना पक्षातील मोठे पद देण्याची शक्यता व्यक्त केली जात होती.पण पुर्वा वळसे यांची एंट्री झाल्याने या मतदासंघातील गुंता कमालीचा वाढला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात भाजपाने लक्ष घालत पवारांना बारामतीतच गुंतवून ठेवण्याची रणनिती आखल्याने शिरुरचा गुंता निवडणुकीच्या वेळीच सुटण्याची शक्यता आहे.

GIF Advt

अनेक वर्षांपासून आपल्या मतदारसंघात तळ ठोकून असलेल्या राजकीय नेत्यांना आणि आपल्या मुलांच्या लॉन्चिंग करण्यात कितपत यश मिळेल हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे शिरूर यंदा कोणाला साथ देणार हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे. या सर्व समीकरणात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचीही भुमिका महत्वाची ठरणार आहे. त्यामुळे निवडणूकी पर्यंत अनेक समीकरणे या मतदारसंघात बनताना दिसण्याची शक्यता आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!