Latest Marathi News
Ganesh J GIF

जिममध्ये व्यायाम करताना हॉटेल चालकासोबत घडले भयानक

जिममधील घटनेचा व्हिडिओ व्हायरल, व्हिडीओ पाहुन तुम्हीसुद्धा थक्क व्हाल

इंदूर दि ६(प्रतिनिधी)- जगात कशाचीच शाश्वती देता येत नाही कारण आपल्यासोबत पुढे काय होणार आहे याची खात्री नसते.क्षणात अनेकांचे आयुष्य बदलते तर काहींच्या आयुष्यावर फुलस्टाॅप लागतो. असाच काहीसा प्रकार असलेला व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. तो पाहुन अनेकांना धक्का बसला आहे.

मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये जिममध्ये व्यायाम करत असताना एका हॉटेल चालकाला हृदयविकाराचा झटका आला त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, काहीच वेळात त्याचा मृत्यू झाला. प्रदीप रघुवंशी असं मृत व्यक्तीचं नाव असून ते वृंदावन हॉटेलचे संचालक होते. रघुवंशी यांनी जिममध्ये गेल्यानंतर सुरुवातीला वॉर्मअप केला. पण जॅकेट काढताना त्यांना चक्कर आल्याने ते थेट कोसळले आणि बेशुद्ध झाले. तातडीने रघुवंशी यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. जिममधील या धक्कादायक घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. रघुवंशी यांचे १५ वर्षांपूर्वी हृदयाचे ऑपरेशन झाले होते. त्यामुळे ते आपल्या तब्येतीबाबत गंभीर होते. ते आठवड्यातून पाच दिवस जिमला जात होते.

महत्वाचे म्हणजे मुलीचे लग्न १७-१८ जानेवारीला होते. त्यांनी आपल्या मुलीच्या लग्नाची निमंत्रणपत्रिका वाटण्यासही सुरुवात केली होती. मात्र, मुलीचे हात पिवळे होण्यापूर्वीच त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यामुळे आता त्या घरात आनंदाएैवजी शोककळा पसरली आहे. सध्या जिममधील व्हिडिओ व्हायरल होत असून अनेकांनी धक्कादायक प्रतिक्रिया दिली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!