
‘हिंदुत्वावर बोलल्यामुळे मला कोट्यवधींचे नुकसान झाले’
या अभिनेत्रीचे वादग्रस्त वक्तव्य, अभिनेत्री असे का म्हणाली, बघा काय झाल?
मुंबई दि १७ (प्रतिनिधी)- आपल्या वादग्रस्ततेमुळे चर्चेतील अभिनेत्री कंगना रनौत नेहमीच तिच्या चित्रपटांमुळे तर कधी वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. अशातच तिने आता हिंदुत्वावर बोलल्यामुळे आपल्याला ३०-४० कोटींचं नुकसान झालं असे वक्तव्य केले आहे.
हिंदुत्व, राजकारणी, टुकडे टोळी यांच्या विरोधात आवाज उठवण्याची किंमत मी चुकवली आहे, असं कंगना म्हणाली आहे. इन्स्टाग्रामवर अभिनेत्रीने स्टोरी शेअर केली आहे. ज्यामध्ये अभिनेत्रीने मोठा खुलासा केला आहे. हिंदुत्वासाठी बोलण्याची, राजकारण्यांविरोधात बोलण्याची, तुकडे तुकडे आणि देशद्रोहींविरोधात आवाज उठवण्याची किंमत आपण चुकवली आहे. उघडपणे बोलल्यामुळे अनेक ब्रँडच्या जाहिराती मला गमवाव्या लागल्या. त्यामुळे ३० ते ४० कोटी रुपयांचे माझे नुकसान झाले आहे. कंगना रनौत हिने इन्स्टाग्रामवर इलॉन मस्क यांची एक बातमी शेअर करत मोठा खुलासा केला आहे. बातमीमध्ये इलॉन मस्क यांनी म्हटलं आहे की, ‘मला जे वाटेल ते मी बोलेल. भले त्यासाठी मला आर्थिक नुकसान सहन कराला लागला तरी चालेल. त्याचबरोबर कंगनाने दावा केला आहे की, तिच्यासोबत हे सर्व घडले असलं तरी ती स्वतंत्र आहे आणि तिला जे बोलायचे आहे ते बोलण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. पोस्टमध्ये तिने मस्क यांचे कौतुक केले आहे. ‘प्रत्येकजण त्यांची कमजोरी दर्शवतो. निदान श्रीमंतांनी तरी पैशाचा विचार करू नये.’, असे तिने म्हटले आहे. तिच्या या इन्स्टा पोस्टमुळे ती पुन्हा चर्चेत आली आहे. तिची इन्स्टा पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
कंगना रनौत हिच्या सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री २०२२ मध्ये ‘धडक’ सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस आली. अभिनेत्रीचा आगामी सिनेमा ‘इमर्जन्सी’चं शुटिंग पूर्ण झालं आहे. सिनेमात कंगना माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.