Latest Marathi News
Ganesh J GIF

‘ठाकरे सरकार फडणवीसांना अटक करणार होते त्या योजनेचा मी साक्षीदार’

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा गाैप्यस्फोट, महाजनांच्या अटकेचा कट, ठाकरेंना दिला इशारा

मुंबई दि २७(प्रतिनिधी)- आजकाल राज्याच्या राजकारणात मोठमोठे गाैप्यस्फोट केले जात आहेत. देवेंद्र फडणवीस नंतर आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा मोठा गाैप्यस्फोट केला आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पत्रकारांशी बोलताना शिंदे यांनी गाैप्यस्फोट केल्याने अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी होण्याची शक्यता आहे.

“महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन विरोधी पक्षनेते आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे सहकारी भाजप नेते गिरीश महाजन यांना अटक करण्याच्या योजनेचा मी साक्षीदार आहे.” असे शिंदे म्हणाले आहेत. “महाजन यांच्या विरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा १९९९ लावण्याची योजनाही त्या सरकारने आखली होती. ती योजना रोखण्यासाठी मी काय म्हणालो होतो त्याचा पुनरुच्चार करू शकत नाही. पण मी तो निर्णय तर बदललाच, पण नंतर संपूर्ण सरकार पाडले आणि त्यांना घरी बसवले. भारतीय जनता पक्षाला याद्वारे मागे ढकलण्याची योजना होती, असा दावा शिंदे यांनी केला आहे. पत्रकारांनी तुम्ही त्या कटाची चाैकशी करणार नाही का? असा सवाल विचारला असता “त्यांना सत्तेतून बेदखल करणे हे पुरेसे आहे. अशा गोष्टींमध्ये कोणाचा सहभाग होता हे मला चांगलेच माहीत आहे. आवश्यकता भासल्यास आम्ही या प्रकरणाची चौकशी सुरू करु” असा इशारा मुख्यमंत्री शिंदे यांनी दिला आहे. पण यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

तत्कालीन उद्धव ठाकरे सरकार आपल्याला अटक करण्याचा विचार करत होते, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनीही केला होता. मात्र, त्यावेळी गृहमंत्री असलेले राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी हा दावा फेटाळून लावला होता. त्यावेळी राज्याच्या राजकारणात चांगलाच कलगीतुरा रंगलेला पहायला मिळाला.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!