
जर उद्धव ठाकरे राजकीय पक्षाचे अध्यक्ष असतील तर…
आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावर नार्वेकरांचे मोठे विधान, विधानसभा अध्यक्षांनी स्पष्टच सांगितले
मुंबई दि १६(प्रतिनिधी)- सुप्रीम कोर्टच्या निकालानंतर शिंदे गटाच्या १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय आता राज्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे आला आहे. राहुल नार्वेकर हे एकनाथ शिंदेंसह १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत मोठे विधान केले आहे.
राहुल नार्वेकर यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका जाहीर केले आहे. याचिकांवर लवकरात लवकर निर्णय घेऊ. निर्णय घेताना कुठलाही विलंब होणार नाही. घाई होणार नाही’. पण त्याचबरोबर काही निर्णय चुकीचा झाला तर त्याचे परिणाम संसदीय लोकशाहीसाठी घातक ठरतील. कोर्टालाही १० महिने लागलेत. त्यामुळे घाई करणार नाही. लवकरात लवकर घेऊ, असे नार्वेकर यांनी सांगितले आहे. विधानसभेत आतापर्यंत असा फाईंड होता की पक्ष गटातील आमदार बहुमताने आपला नेता आणि प्रत्येक निवड करून विधिमंडळाला कळवत होते. त्यानुसार त्याला मंजुरी मिळत होती. परंतु न्यायालयाच्या निर्देशानुसार राजकीय पक्ष कोण हे ठरवावे लागणार आहे. शिवसेनेतील दोन गटांमुळे जुलै २०२२ मध्ये राजकीय पक्ष कोणत्या गट होता, याची खात्री केल्यानंतर त्या पक्षाने नेमलेल्या प्रतोदला द्यावी लागणार आहे. त्या मान्यतेनंतर अपात्रतेबाबत निर्णय घेण्यासाठी पक्षादेश तपासले जातील, असे राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले आहे. शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांची निवड करताना, राजकीय पक्षाचे प्रतिनिधी होते की नाही याची खातरजमा केली नाही. न्यायालयाने त्यामुळे तो निर्णय बाद ठरवला. परंतु गोगावले यांची निवड कायमच नियमबाह्य आहे, असे म्हटलेले नाही. उद्या राजकीय पक्ष म्हणून शिंदे नेते असतील तर त्यांना मंजुरी देऊ. उद्धव ठाकरे राजकीय पक्षाचे अध्यक्ष असतील, तर त्यांची निवड करण्यात येईल, असे नार्वेकर यांनी सांगितले.
यावेळी बोलताना राहुल नार्वेकरांनी संजय राऊत यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे, ते म्हणाले, “मला धमक्या देऊन हवा तो निर्णय मिळणार नाही. संजय राऊत यांच्या टीकेला मी काडीमात्र किंमत देत नाही. त्याचबरोबर संजय राऊतांकडं दुर्लक्ष केलेलं बरं असतं. मात्र, त्यांनी वेळीच आपलं बोलणं थांबवावं” असा टोला नार्वेकरांनी लगावला आहे.