Just another WordPress site

कहरच! उल्हासनगरमध्ये बेभान जोडप्याचा बाईकवर नको तो उद्योग

प्रेमी जोडप्याचा संतापजनक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल, नेटक-यांकडून संतप्त प्रतिक्रिया

मुंबई दि १६(प्रतिनिधी)- आजकाल प्रेमी जोडप्याचे बाईकवर विचित्र चाळे करतानाचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. दिल्ली मेट्रोतील व्हिडिओने तर चांगलीच खळबळ उडाली होती. आता सध्या उल्हासनगर येथील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक तरुणी आपल्या बॉयफ्रेंडच्या बाईकवर मागच्या सीटवर बसून चक्क आंघोळ करताना दिसत आहेत.

GIF Advt

मे महिन्याचा उकाडा चांगलाच वाढला आहे. अंगाची लाही लाही होत असताना अनेकजण थंडावा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. पण उल्हासनगरमध्ये मात्र एका जोडप्याने भररस्त्यातच आंघोळ केली. पण हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भररस्त्यात आंघोळीचा प्रकार अगदीच मर्यादा सोडून असल्याचे नेटकरी म्हणत आहेत. अलीकडे अनेकजण व्हायरल किंवा फेमस होण्यासाठी असे प्रकार होत असल्याची टिका केली आहे. सध्या या व्हिडिओवर जोरदार संताप व्यक्त होत आहे.

व्हिडीओ पोस्ट करणाऱ्या अकाउंटवर महाराष्ट्र पोलिसांना सुद्धा टॅग करण्यात आले आहे. सदर व्हिडीओ उल्हासनगरमधील असून सार्वजनिक ठिकाणी अशी वागणूक करणाऱ्यांवर पद्धतशीर कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!