Just another WordPress site

जगदीप धनखड भारताचे नवे उपराष्ट्रपती

युपीएच्या मार्गारेट अल्वा यांचा केला पराभव

दिल्ली दि ६ (प्रतिनिधी)- भाजपचे उमेदवार जगदीप धनकड हे जगदीप धनखडभारताच्या उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत विजयी झाले आहेत. काँग्रेससह इतर विरोधकांच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांचा त्यांनी पराभव केला. लोकसभेचे महासचिव उत्पल कुमार सिंग यांनी दोन्ही उमेदवारांना मिळालेल्या मतांची माहिती दिली. त्यानुसार, ७८० मतदारांपैकी ७५० जणांनी मतदानाचा हक्क बजावला. या निवडणूकीत एकूण ९२.९४ टक्के मतदान झाले.यात जगदीप धनकड यांना ५२८ मतं, तर मार्गारेट अल्वांना १८२ मतं मिळाली. जगदीप धनकड यांनी मार्गारेट अल्वांचा ३६४ मतांनी पराभव केला.

GIF Advt

जगदीप धनकड हे मूळचे राजस्थान येथील आहेत. ते १९८९ ते १९९१ याकालावधीत जनता दलाच्या तिकिटावर लोकसभेचे खासदार होते.तद्नंतर १९९३ ते १९९८ दरम्यान ते राजस्थानच्या किशनगढ येथून विधानसभेचे आमदार राहिले होते. व्यवसायाने वकील राहिलेल्या धनकड यांची पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून २०१९ मध्ये नियुक्ती करण्यात आली होती.त्याठिकाणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी अनेकवेळा वाद झाला होता.जगदीप धनखड यांच्या विजयानंतर भाजपा कार्यालयाबाहेर जल्लोष करण्यात आला. अमित शहा यांनी धनखड यांची भेट घेत अभिनंदन केले.

 

बहुमतानं सत्तेत असलेल्या भाजपाचे उमेदवार जगदीप धनखड यांचा विजय जवळपास निश्चितच होता. त्यात तृणमूल काँग्रेसनं निवडणुकीत तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. तसंच आणखी काही पक्षांनी भाजपाला पाठिंबा दिला. त्यामुळे जगदीप धनखड यांच्या विजयाचा मार्ग अधिक सुकर झाला.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!