Latest Marathi News
Ganesh J GIF

तो मेडिकल स्टोअरमध्ये औषध घेण्यासाठी गेला आणि…

अंगावर काटा आणणारी घटना सीसीटीव्हीमध्ये कैद, बघा नेमकं काय घडल

लखनऊ दि ६(प्रतिनिधी)- आपल्यासोबत कधी कुठल्या क्षणी काय होईल हे सांगता येत नाही. असाच एक धक्कादायक प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. सीसीटीव्हीत कैद झालेल्या या विचित्र घटनेनंतर प्रत्येकजण आवक होईल असा प्रकार त्या घटनेत घडला आहे.

एक व्यक्ती मेडीकल स्टोअरमधील दुकानातून ओआरएस आणण्यासाठी गेला. पण त्या व्यक्तीला तिथेही अस्वस्थ असल्यासारखे वाटत होते. दुकानदार त्या व्यक्तीला ओआरएस देणार तेवढ्यात तो व्यक्ती खाली कोसळली. हृदयविकाराचा झटका आल्याने त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. मृत्यूचा हा थरार दुकानात असलेल्या सीसीटीव्हीत कैद झाला आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील एटा जिल्ह्यातील आहे. संजय असं या व्यक्तीचं नाव असून तो २३ वर्षांचा होता. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्वीटरवर @tricitytoday या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे.

यमराज आपल्याला कधी कुठे गाठेल याचा काही नेम राहिलेला नाही. म्हणून आयुष्य जगताना प्रत्येक क्षणाचा आनंद घेणे महत्वाचे आहे. दरम्यान सोशल मीडियावर समोर आलेला हा व्हिडिओ नेटकऱ्यांना हैराण करुन सोडत आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!