Latest Marathi News
Ganesh J GIF

बच्चू कडू ‘धनुष्यबाण’ हाती धरणार?

गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. माजी मंत्री आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांनी आपला पक्ष शिवसेनेत (एकनाथ शिंदे गट) विलीन करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी या प्रवेशामागची भूमिका स्पष्ट केली असून, ‘शेतकरी आणि मजुरांच्या हितासाठीच धनुष्यबाण हाती घेतोय,’ असे त्यांनी ठामपणे सांगितले.

बच्चू कडू म्हणाले की, शिवसेनेचा धनुष्यबाण शेतकरी आणि मजुरांसाठी हाती घेणार आहोत. प्रहार सामाजिक संघटना आणि दिव्यांग संघटना काय राहणार आहे. शिवसेना कशी वाढेल, यासाठी अंगातील प्रत्येक थेंब जेवढा पक्षासाठी धावणार आहे, तेवढात शेतकऱ्यांसाठी धावणार आहे.

शिवसेनेचा धनुष्यबाण शेतकरी आणि मजुरांसाठी हाती घेणार आहोत. आमचे सगळे मुद्दे शिवेसेनेनं स्वीकारले आहेत. पेरणी ते कापणीपर्यंत सगळे मुद्दे रोजगार हमी योजनेत घ्यावेत. हमीभावात सुधारणा करण्याची गरज आहे. लाडक्या बहिणीमधील विधवा बहिणी कोरड्या आहेत. दिव्यागांचे मंत्रालय एकनाथ शिंदेंनी स्थापन केले. पण, त्याचे बळकटीकरण झाले नाही. हे सगळे मुद्दे मान्य झाल्यानंतर हा निर्णय घेतला आहे, असं बच्चू कडू म्हणाले.

शिवसेनेची राजकीय ताकद बळकट करण्याचे काम करू. आम्हाला शेतकरी, दिव्यागांची ताकद हवी आहे. त्याबद्दल कोणताही समजोता होणार नाही. शिंदेंच्या नेतृत्त्वात दिव्यांग मंत्रालय उभे राहत असेल तर बळकटीकरणासाठी प्रयत्न झाला पाहिजे. शेतकऱ्यांच्या लढाईत एक इंचही कमी पडणार नाही. प्रहार सामाजिक संघटना आणि दिव्यांग संघटना काय राहणार आहे. शिवसेना कशी वाढेल, यासाठी अंगातील प्रत्येक थेंब जेवढा पक्षासाठी धावणार आहे, तेवढात शेतकऱ्यांसाठी धावणार आहे, असंही बच्चू कडू म्हणाले.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!