Just another WordPress site

गाैतमी पाटीलच्या अंदामुळे ग्रामपंचायतीला फटका

गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पुन्हा राडा, प्रेक्षकांच्या गोंधळामुळे बघा काय घडल

अ.नगर दि ३०(प्रतिनिधी)- गौतमी पाटील हे महाराष्ट्रभर गाजत असलेलं नाव आहे. नृत्यांगणा गौतमी पाटीलची क्रेझ लहानांपासून ते वयोवृद्धांपर्यंत आहे. हल्ली छोटे मोठे वाढदिवस असो, गावजत्रा असो गौतमी पाटीलचा डान्स कार्यक्रम फिक्स असतो. पण तिच्या कार्यक्रमाचा फटका एका ग्रामपंचायतीला सहन करावा लागला आहे.

पारनेर तालुक्यातील जवळे येथे पैलवान जयदीप सालके आणि सौरव लोखंडे यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमानिमित्त लावणी नृत्यांगना गौतमी पाटील च्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमात प्रेक्षकांनी गौतमी पाटीलच्या अदाकारींवर ठेका धरत कार्यक्रमात धुडगूस घातला. यावेळी प्रेक्षक गौतमीच्या अदाकारींवर बेभान होऊन नाचले. तर काही प्रेक्षक कार्यक्रम पाहण्यासाठी ग्रामपंचायतने बांधलेल्या गाळ्यांवरती चढल्याने अनेक गाळ्यांचे पत्रे हि फुटले. त्यामुळे पत्र्याला मोठे भगदाड पडून एक युवक गाळ्यात खाली कोसळला. नंतर त्याला बाहेर काढण्यात आले. दरम्यान या घटनेत तो जखमी झाला. याच दरम्यान पत्र्याला भगदाड पडून तरुण खाली पडल्याने दुकानातील काही साहित्याची मोडतोड झाली. गेल्या वर्षभरापासून गौतमी पाटील महाराष्ट्रातील तरुणांच्या मनावर राज्य करत आहे. तिचे लावणीचे कार्यक्रम तुफान गाजतात. तिची लावणी पाहण्यासाठी पंचक्रोशीतून लोक येत असतात. दरम्यान गौतमी पाटीलचा कार्यक्रम म्हंटले की हंगामा तर होणारच हे समीकरणच बनले आहे.

GIF Advt

अनेकवेळा गौतमी पाटील वादाच्या भोवऱ्यातही सापडते. कधी आपल्या अश्लील हावभावांमुळे तर कधी लावणीच्या चुकीच्या स्टेप्स करत ती लोकांच्या निशाण्यावर येते. दरम्यान दुकानदाराकडून आपल्या दुकानाच्या नुकसान भरपाईची मागणी केली जात आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!