Latest Marathi News
Ganesh J GIF

पाकिस्तानी खेळाडूने जिंकलेली आयपीएलची पर्पल कॅप

आयपीएल जिंकण्यात या संघाचा आहे दबदबा, पर्पल कॅप विजेत्या खेळाडूंची संपूर्ण यादी

मुंबई दि ३०(प्रतिनिधी)- इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत आपल्या गोलंदाजीची धार दाखवून देणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅप देऊन गौरव करण्यात येतो. आतापर्यंतच्या १५ हंगामात १३ गोलंदाजांनी पर्पल कॅप जिंकली आहे. यामध्ये परदेशी खेळाडूंचा दबदबा राहिला आहे. ७ विदेशी तर ६ भारतीय गोलंदाजांनी पर्पल कॅपवर नाव कोरले आहे.

पाकिस्तानी वेगवान गोलंदाज सोहेल तन्वीरने पहिल्या हंगामात पर्पल कॅप जिंकली होती. २००८ च्या आयपीएलमध्ये त्याने राजस्थान रॉयल्सकडून खेळताना सर्वाधिक विकेट घेतल्या होत्या. तर आर.पी. सिंग हा पर्पल कॅप जिंकणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला होता.
२००८ – सोहेल तन्वीर (राजस्थान रॉयल्स) २२ बळी
२००९ – आर.पी. सिंग (डेक्कन चार्जर्स) २३ बळी
२०१० – प्रज्ञान ओझा (डेक्कन चार्जर्स) २१ बळी
२०११ – लसिथ मलिंगा (मुंबई इंडियन्स) २८ बळी
२०१२ – मोर्ने मॉर्केल (दिल्ली डेअरडेव्हिल्स) २५ बळी
२०१३ – ड्वेन ब्राव्हो (चेन्नई सुपर किंग्ज) ३२ बळी
२०१४ – मोहित शर्मा (चेन्नई सुपर किंग्ज) २३ बळी
२०१५ – ड्वेन ब्राव्हो (चेन्नई सुपर किंग्ज) २६ बळी
२०१६ – भुवनेश्वर कुमार (सनरायझर्स हैदराबाद) २३ बळी
२०१७ – भुवनेश्वर कुमार (सनरायझर्स हैदराबाद) २६ बळी
२०१८ – अँड्र्यू टाय (किंग्ज इलेव्हन पंजाब) २४ बळी
२०१९ – इम्रान ताहिर (चेन्नई सुपर किंग्ज) २६ बळी
२०२० – कागिसो रबाडा (दिल्ली कॅपिटल्स) ३० बळी
२०२१ – हर्षल पटेल (रॉयल चॅलेंजर्स बंगलोर) ३२ बळी
२०२२- यजुवेंद्र चहल (राजस्थान राॅयल्स) २७ बळी

संघ म्हणून पर्पल कॅप जिंकण्यात चेन्नई सुपर किंग्जच्या गोलंदाजांचा दबदबा राहिला आहे. चेन्नईच्या खेळाडूंनी आतापर्यंत चार वेळा ही कॅप जिंकली आहे. तर सलग तीन वर्ष पर्पल कॅप चेन्नईकडेच होती.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!