Latest Marathi News
Ganesh J GIF

लोणी काळभोर पोलिसांची मोठी कारवाई; २००३ मधील खून अन् दरोड्याच्या गुन्ह्यातील जप्त दागिने २३ वर्षांनंतर फिर्यादीच्या स्वाधीन!

पुणे शहरातील लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत २३ वर्षांपूर्वी घडलेल्या एका गंभीर दरोडा आणि खून प्रकरणातील जप्त सोन्याचे दागिने अखेर मूळ फिर्यादीला परत मिळवून देण्यात पोलिसांना यश आले आहे. मा. न्यायालयाच्या आदेशानुसार, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर १७ ऑगस्ट २०२६ रोजी हे दागिने फिर्यादीच्या स्वाधीन करण्यात आले.

२००३ मधील दरोडा आणि खूनाचा गुन्हा

लोणी काळभोर पोलीस ठाण्यात सन २००३ मध्ये भा.द.वि. कलम ३९४ (दरोडा/चोरी करताना दुखापत करणे) आणि ३०२ (खून) अंतर्गत गुन्हा नोंद (गु.र.नं. २०२/२००३) दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांनी आरोपींकडून सोन्याचे विविध दागिने जप्त केले होते.परत करण्यात आलेल्या दागिन्यांमध्ये सोन्याचे मणी मंगळसूत्र: ६.३४० ग्रॅम,सोन्याची बोरमाळ: ४.८०० ग्रॅम,सोन्याचे झुबे (जोडी): २.७७० ग्रॅम,सोन्याची नथ: ०.४८० मिलीग्राम

न्यायालयाच्या आदेशाने बी.एन.एस.एस. अन्वये कारवाई

कायदेशीर प्रक्रियेचा भाग म्हणून मा. न्यायालयाच्या आदेशान्वये आणि भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) १०६ (३) पोटकलम १ अन्वये दिलेल्या बंधपत्रानुसार (Bond) हे दागिने सुपूर्द करण्यात आले. फिर्यादी अनिता दत्तात्रय टिपे (वय ४२ वर्षे, रा. शिव शंभो सोसायटी, गोसावी वस्ती, आश्रमरोड, उरुळी कांचन, ता. हवेली, जि. पुणे) यांनी सर्व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर, लोणी काळभोर पोलिसांनी अधिकृतपणे सर्व १४.३९ ग्रॅम सोन्याचे दागिने त्यांच्या ताब्यात दिले आहेत. अनेक वर्षांनंतर आपले दागिने परत मिळाल्याने फिर्यादीने पोलीस आणि न्यायव्यवस्थेचे आभार मानले आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!