Latest Marathi News
Ganesh J GIF

धनगर समाजाच्या मागण्या सरकारला कळविल्या एवढाच त्या पत्राचा अर्थ!

इन्डी आघाडीतील पक्षांवर या नेत्याचा हल्लाबोल, मविआने आकसपूर्ण राजकारण केल्याचा आरोप

मुंबई दि २०(प्रतिनिधी)- धनगर समाजाचे विविध आंदोलने सुरू असून,त्यांच्या समस्या घेऊन प्रदेश चिटणीस नवनाथ पडळकर व राम वडकुते माझ्याकडे आले होते. धनगर समाजाच्या मागण्या व समस्या सरकारकडे पाठविल्या. तेवढाच त्या पत्राचा अर्थ असून त्यापेक्षा अधिक नाही, असे मत भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले. कुणीतरी या पत्राचा वापर करून वातावरण खराब करीत आहेत, असाही आरोप त्यांनी केला.

बावनकुळे यांनी दिलेल्या पत्राला सोशल मीडियावर प्रसारित करून त्याचा अपप्रचार सुरू असल्याच्या प्रकार चुकीचा आहे, असे मत व्यक्त करून ते म्हणाले की, महिला आरक्षण विधेयकामुळे कॉंग्रेस पक्ष बॅकफूटवर गेला आहे. त्यामुळे त्यांचे नेते काहीतरी बोलत सुटले आहेत. राज्यातील कॉंग्रेस नेत्यांमध्ये एकमेकांपेक्षा अधिक जलद कोण बोलू शकतो याविषयीच स्पर्धा लागली आहे. सुरुवातील कोण बोलते हे त्यांना कॉंग्रेसच्या दिल्ली दरबारी दाखवायचे आहे. मध्यप्रदेशातील कॉंग्रेसचे नेते कमलनाथ यांचा मराठी मतदारांवर डोळा असून पंढुर्णा येथे छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा पुतळा बसवून त्याचे अनावरण आदित्य ठाकरेंच्या हस्ते करून ते केविलवाना प्रयत्न करीत आहेत. त्यापूर्वी त्यांनी त्यांच्याच लोकसभा मतदारसंघातील सौंसर येथील श्री शिवाजी महाराजांचा पुतळा का पाडला यावर उत्तर द्यावे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या कार्यकाळात जिल्हा नियोजन समितीचा निधी विरोधी पक्षातील आमदार व लोकप्रतिनिधींना मिळू नये असा अलिखित आदेश काढला होता. त्यांनी आकसापोटी राजकारण केले. आता ते लोक निधीवाटपावर बोलत आहेत त्यांनी स्वत:कडे बघावे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूरचे पालकमंत्री आहेत, त्यांनी डीपीसीमधून एक हजार कोटींचा निधी दिला आहे. या विकासनिधीचा योग्य वापर व्हावा, विविध योजना राबविल्या जाव्या, अशी आमची भूमिका आहे. असेही ते म्हणाले

महिलांनी राजकारणात पुढे यावं ही भाजपची कायम भूमिका राहिली. त्यामुळेच भाजपामध्ये १५ लाखाहून अधिक महिला पदाधिकारी आहेत. कॉंग्रेसने तब्बल १२ वेळा महिला आरक्षण कायदा संसदेतून परत पाठविला, कॉंग्रेस व उबाठा गटाकडे महिला नेतृत्त्व नाही. महाविकास आघाडीला जेव्हा वाटतं आपण हरतो आहोत तेव्हा ते इतरांसमोर प्रश्नचिन्ह लावतात असाही दावा त्यांनी केला आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!