Latest Marathi News
Ganesh J GIF

‘मेरा बाप मेरा है,और तेरा बाप भी मेरा है’

इस्लामपूरात गद्दार दिन साजरा, घोषणांनी परिसर दणाणला, सरकारवर जोरदार टिका

इस्लामपूर दि २० (प्रतिनिधी)- राज्याच्या शिंदे सरकारला एक वर्ष पूर्ण होत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने इस्लामपूर येथील कचेरी चौकात गद्दार सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी ५० खोके,एकदम ओके, खोके सरकार हाय-हाय आदी घोषणां नी परिसर दणाणून सोडला.

ज्यांना रिक्षा ड्रायव्हरचा राज्याचा मंत्री केले,त्या पक्षाशी आणि नेतृत्वाशी जे प्रामाणिक राहिले नाहीत, ते राज्यातील जनतेशी कसे प्रामाणिक रहाणार? जे हिंदुत्वाची भाषा करून सत्तेवर आले,त्यांनी गेल्या एक वर्षात हिंदूंच्यासाठी विशेष काय केले?असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजयराव पाटील यांनी केला. सुस्मिता जाधव म्हणाल्या,मेरा बाप मेरा है,और तेरा बाप भी मेरा है असे म्हणणाऱ्या संस्कृतीचे हे गद्दार सरकार आहे. या सरकार ला राज्यातील जनतेच्या प्रश्नांशी कोणतीही बांधिलकी नाही. राज्यातील जनता त्यांना त्यांची जागा दाखवून देईल. शहाजी पाटील म्हणाले,ज्यांनी स्वराज्याशी गद्दारी केली,त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी हत्तीच्या पायाखाली दिले. राज्या तील जनता गद्दार सरकारचा निश्चित कडेलोट करेल. अरुण कांबळे म्हणाले,खरा गद्दार अण्णाजी पंत असून त्यांनी हे षड्यंत्र रचले आहे. आम्ही कोणाच्या दबावास बळी पडणार नाही. शिवाजी चोरमुले म्हणाले,राज्यातील १३ कोटी जनतेची फसवणूक करून सत्तेवर आलेल्या गद्दार सरकरला घरी घालवू. यावेळी सुनिता देशमाने,कमल पाटील,रोझा किणीकर,संग्राम जाधव यांनीही तीव्र शब्दात गद्दार सरकारचा निषेध केला.

प्रारंभी पदवीधर सेलचे राज्य उपाध्यक्ष विशाल सुर्यवंशी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. याप्रसंगी शशिकांत पाटील,सुहास पाटील, शिवाजी आपुगडे, सर्जेराव देशमुख, डॉ.संग्राम पाटील,कार्तिक पाटील,विठ्ठल पाटील,अमरसिंह साळुंखे,सौ.अलका माने, अनिल गायकवाड,विजयराव लोंढे,नंदकुमार पाटील, संजय जाधव,ब्रम्हानंद पाटील, आबासो पाटील,सतिश माळी,मुकुंद इंगळे, नितीन पाटील,विनायक यादव,विनायक मोटे,संतोष पाटील, प्रवीण पाटील,अँड. संपतराव पाटील,अनिल साळुंखे,लालासो वाटेगावकर, संजय सोनटक्के,राहुल नागे, शुभम पाटील,सारंग भोसले यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. संजय पाटील (नेर्ले) यांनी आभार मानले.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!