Just another WordPress site

मनसेचे नाना भानगिरे यांना आव्हान म्हणाले हिंमत असेल तर…

नाना भानगिरेंच्या त्या दाव्याची मनसेने उडवली खिल्ली, मनसे शिंदे गटात कोणता वाद

पुणे दि १९(प्रतिनिधी)- शिंदे गटात दिवसेंदिवस इनकमिंग होतच आहे.ठाकरेंच्या शिवसेनेबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतेही शिंदे गटात येत आहेत. पण आता शिंदे गटाने मनसेचे अनेक नेते शिंदे गटात येणार असल्याचा दावा केला आहे. त्याला मनसेने प्रत्युत्तर दिले आहे.

GIF Advt

मनसेने शिंदे गटाचे पुणे शहराध्यक्ष नाना भानगिरे यांनी पुण्यात नवीन बाळासाहेवांची शिवसेना कार्यालयाच्या उद्घाटनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मनसे, राष्ट्रवादी, आणि काँग्रेस नेते ही शिंदे गटात प्रवेश करतील असा दावा केला होता.त्याला उत्तर देताना मनसेचे प्रवक्ते हेमंत संभूस म्हणाले की, “आमच्या पक्षातील कुठलाही नेता हा शिंदे गटात जाणार नाही.पुणे शहराचे शिंदे गटाचे अध्यक्ष नाना भानगिरे चांगला माणूस आहे.त्याने त्यांचे काम व्यवस्थित करून पक्ष वाढवण्याचे काम करावे. त्यांनी मनसे पक्षाबाबत केलेला दावा हास्यास्पद आहे. नानाने अगोदर मनसेकडून निवडणूक लढवली होती. त्यानंतर शिवसेना आणि आता शिंदे गटात गेले आहेत. नाना भानगिरे यांनी दोन-तीनदा पक्ष बदलला. हिमंत असेल तर मनसेचे कोणते नेते शिंदे गटात येणार असतील तर त्या नेत्यांची नावं जाहीर करावीत” असे म्हणत मनसेने भानगिरे यांना डिवचले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड केल्यानंतर आतापर्यंत शिवसेनेचे आमदार, खासद्सर, सचिव , गटप्रमुख, आणि अन्य कार्यकर्ते हे शिवसेनेचे फोडले होते. मात्र, आता शिंदे गटात मनसे , राष्ट्रवादी काँग्रेस, आणि काँग्रेसचे मोठे नेते ही प्रवेश करत असल्याचे चित्र आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!