Latest Marathi News
Ganesh J GIF

नणंद भावजयींनी हातचलाखीने घातला सराफाला गंडा

चोरीचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल, तब्बल इतक्या सराफांना घातलाय गंडा, अशी करायच्या चोरी

कल्याण दि १(प्रतिनिधी)- महाराष्ट्रात चोरींच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.पोलीसांनी सीसीटीव्हीच्या आधारे सराफांना गंडा घालणाऱ्या दोन महिलांना बेड्या ठोकल्या आहेत. खरेदीच्या बहाण्याने बोलण्यात गुंतवत त्यांनी अनेकांना गंडा घातला होता. पण अखेर ही जोडी पोलीसांच्या हाती लागली आहे.

उषाबाई मकाळे आणि निलाबाई डोकळे अशी आरोपी नणंद-भावजयीची नावे आहेत. दोघीही मूळच्या औरंगाबाद येथील रहिवासी असून, सध्या ठाण्यातील खारेगाव परिसरात झोपडी बांधून राहत होत्या. मिळालेल्या माहितीनुसार डोंबिवली पूर्वेला विनायक ज्वेलर्स नावाचे एक दुकान आहे. काही दिवसांपूर्वी दोन महिला विनायक ज्वेलर्स या दुकानात खरेदीच्या बहाण्याने गेल्या होत्या. तिथे त्यांनी दुकानमालकाला बोलण्यात गुंतवून हातचलाखीने दुकानातील दागिने चोरले. काही वेळाने हे दुकानदाराच्या लक्षात आल्यानंतर त्याने त्या महिलांचा शोध घेतला, पण त्या गायब झाल्या होत्या. सराफाने तातडीने रामनगर पोलिसात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासत त्याआधारे महिलांची ओळख पटवली. दोघींना अटक केली आहे. दोघींवर राज्यभरात १६ गुन्हे दाखल आहेत.

डीसीपी सचिन गुंजाळ, एसीपी सुनील कुऱ्हाडे, रामनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गीते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी बलवंत भराडे, पोलीस कर्मचारी सचिन भालेराव यांच्या पथकाने ही कारवाई केली. पोलीस आरोपींची सखोल चौकशी करत आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!