Latest Marathi News
Ganesh J GIF

उस्मानाबाद वाहतूक पोलीसीची खुलेआम हप्ताखोरी

हप्ता मागतानाची घटना कॅमे-यात कैद, कारवाईची मागणी

उस्मानाबाद दि १ (प्रतिनिधी)- उस्मानाबादमध्ये हप्ता मागणारा वाहतूक पोलीस कर्मचारी कॅमेऱ्यात अचूकपणे कैद झाला आहे. त्यामुळे वाहनचालकांकडून पैसे उकळ्याच्या घटना सर्रास सुरु असल्याचे दिसून आले आहे. वाहतूक पोलिसांच्या लुबाडण्याचे अनेक प्रकार याआधी उघड झाले आहेत. अशा वाहतूक पोलिसांवर कायदेशीर देखील कारवाई करण्यात आलेली आहे. पण तरीही काही वाहतूक पोलीस कर्मचारी आपली मुजोरी दाखवत असल्याचे दिसून आले आहे. आता हा व्हिडिओ समोर आल्याने कारवाईची मागणी करण्यात येत आहे.

उस्मानाबाद-लातूर रोडवर एक वाहतूक पोलीस वाहन चालकाला हप्ता मागतान कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या हप्तेखोरीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. बार्शी तालुक्यातील अस्लम जानूर शेख आपल्या वाहनात शेळ्या घेऊन लातूरकडे चालला होता. उस्मानाबाद – लातूर हद्दीवर पोलिसांनी त्याची गाडी आडवली. त्याच्याकडे पैशांची मागणी केली. गुन्हा दाखल केला तर चार हजार दंड होईल. प्रत्येक शेळीचे १० रुपये पैसे दे, अशी मागणी केली.एवढचं नाही तर रिकाम्या गाडीचे ५० तर भरलेल्या गाडीचे १०० रुपये लागतील, असं वाहन चालकाला बजावले. हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे.

वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांना आपल्याकडे तितके पैसे नाहीत म्हणून विनवणी करतात. पण तरीही ते ऐकत नाहीत आणि जास्त पैसे वसूल करण्याची धमकी देत नागरिकांना लुबाडतात. वाहतूक पोलिसांच्या याच मुजोरीचा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. त्या पोलीसावर कारवाई होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे?

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!