Latest Marathi News
Ganesh J GIF

संगीताच्या कार्यक्रमात लोकांकडून नोटांची उधळण

गुजराती समाजाच्या कार्यक्रमात दाैलत जादा कॅमे-यात कैद, स्टेजवर नोटांचा खच

विरार दि ६(प्रतिनिधी)- गुजराती समाजाच्या एका संगीत कार्यक्रमात नोटांचा पाऊस पडला आहे. विरारमध्ये आयोजित एका कार्यक्रमात लोकांकडून पैशांची उधळण करण्यात आली आहे. याचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे.

विरार पूर्व परिसरात सकवार येथे गुजराती समाजातर्फे एका संगीत जलासा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात नोटांची उधळण करण्यात आली. यात अनेक श्रोते गायक आणि एकमेकांवर नोटांचा वर्षाव करत करताना दिसून आले. या व्हिडिओ मध्ये स्टेजवर नोटांचा खच पहायला मिळाला. तर, स्टेजच्या खाली एक व्यक्ती टोपली घेवून या नोटा टोपलीत गोळा करत होता. ही सर्व दृश्य मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. नोटा उधळतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गुजराती समाजात अनेकवेळा सांगितिक कार्यक्रमात नोटा उधळण्याच्या घटना समोर आल्या आहेत.अशा कार्यक्रमात यापूर्वी देखिल नोटा उधळत असल्याचे प्रकार घडले होते. सध्या या प्रकारावर समिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.

 

सोशल मिडीयावर काही दिवसापुर्वी गुजरातमधील एका कुटुंबात लग्न सोहळ्यात नोटांची उधळण करण्यात आली होती. सरपंचाने आपल्या पुतण्याच्या लग्नात ही नोटांची उधळण केली होती. त्यावेळी वराडात आलेल्या पाहुणे नोटा गोळा करताना दिसून आले होते.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!